Dr. Prakash Amte : पहिला राजर्षी शाहू महाराज पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर; शाहू समूहानं घेतली सामाजिक कार्याची दखल

५० वर्षांपासून आदिवासी जनतेची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
Dr. Prakash Amte
Dr. Prakash Amteesakal
Updated on
Summary

याबाबतची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कागल : शाहू उद्योगसमूहाचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे (Vikramsingh Ghatge) यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत सामाजिक कार्य अविरतपणे करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्यानुसार पहिला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज २०२३ पुरस्कार (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Award) गडचिरोली जिल्ह्यातील ‘हेमलकसा’सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५० वर्षांपासून आदिवासी जनतेची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना जाहीर झाला.

Dr. Prakash Amte
Maharashtra Politics : चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी राज्यासाठी काय केलं? राजन तेलींचा सुप्रिया सुळेंना सवाल

याबाबतची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता येथील शाहू शिक्षण संकुलच्या पटांगणावर ‘छत्रपती शाहू लोकरंग महोत्सव २०२३’ कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Dr. Prakash Amte
Eknath Shinde : मराठा समाजानं धीर धरावा, महायुती सरकार कायद्यात टिकणारं आरक्षण देईल; CM शिंदेंचं मोठं आश्वासन

१९७३ पासून माडिया आणि गोंड आदिवासी जनतेला लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे व पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे अहोरात्र सामाजिक सेवा व वन्य प्राण्यांच्या संवर्धनात व्यस्त आहेत. लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी हॉस्पिटल, निवासी आश्रमशाळा, जखमी वन्य प्राण्याच्या संरक्षणासाठी अनाथालय, ज्येष्ठांसाठी उत्तरायण, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.