सुपात्रे येथे गवत गंज्यांना आग

In villege supatre  Fire the grass bale
In villege supatre Fire the grass bale
Updated on

बांबवडे ः सुपात्रे पैकी हणमंतवाडी (ता. शाहूवाडी) येथे गवत व पिंजरांच्या गंज्यांना आग लागून 1 लाख 52 हजारांचे नुकसान झाले. पावसाळ्यासाठी जनावरांची तरतूद करून ठेवलेले गवत व पिंजार जळाल्याने शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. उदय कारखान्याचे संचालक रणवीर गायकवाड यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली.

हणमंतवाडी येथे आज दुपारी एकच्या दरम्यान गावच्या दक्षिणेकडील बाजूस शेतकऱ्यांनी चारा रचून ठेवला होता. तो आगीत जमीन खाक झाला. आगीत बापू साधू सावेकर, दगडू बापू पंदारे, सखुबाई यशवंत भाकरे, वंदना बाजीराव भाकरे, ज्ञानू विठू सावेकर, संजय हरी सावंत, आक्काताई विश्वास दाते, रखमाबाई बंडू दाते, रंगराव नामू चिले, आशा तानाजी सावेकर, भीमराव रामचंद्र सावेकर या शेतकऱ्यांचा चारा जळून खाक झाला. गावकामगार तलाठी बी. एल. मुजुमदार यांनी पंचनामा केला. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.