कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना 'या' कारणासाठी न्यायालयाने बजावली नोटीस...

Violation of election code of conduct by Chief Minister Yeddyurappa has been issued notice
Violation of election code of conduct by Chief Minister Yeddyurappa has been issued notice
Updated on

बेळगाव - निवडणुक अचारसंहिता भंग प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला "बी रिपोर्ट" न्यायालयाने फेटाळत मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांना नोटीस बजावली आहे. 2019 मधील गोकाक विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मतदारांना आकर्षित केल्याप्रकरणी न्यायालयात सुणावणी सुरू आहे. तत्कालीन भाजप उमेदवार रमेश जारकीहोळी यांचा प्रचारसभेत विरशैव लिंगायत समाजाला त्यांनी मतदानाचे आवाहन केले होते.

निवडणुक अचारसंहितेचा भंग

2019 मध्ये रोजी गोकाक विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रमेश जारकीहोळी यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी भाग घेतला होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी गोकाकमधील प्रचारसभेत विरशैव लिंगायत समुदायाने भाजपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. गोकाक मतदार संघात लिंगायत समुदायाची संख्या अधिक असून एका समुदायाला आकर्षित केल्यामुळे निवडणुक अचारसंहितेचा भंग झाला होता. याप्रकरणी गोकाक टाऊन पोलिस स्थानकात अचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाची सुणावणी जेएमएफसी प्रधान न्यायाधीशांसमोर सुरू आहे.

गोकाक टाऊन पोलिस स्थानकाच्या चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयात बी रिपोर्ट दाखल करीत हे प्रकरण रद्दबातल करण्याची विनंती केली होती. ज्यात कामाचा दबाव वाढणे आणि या प्रकरणातील काही मुद्दे चुकल्याचे कारण न्यायालयापुढे मांडण्यात आले होते. पण, न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला बी रिपोर्ट फेटाळून लावला असून मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.

संपादन - मतीन शेख
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.