पंधरा वर्षांवरील वाहने स्क्रॅप होणार ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

viral message on social media 15 year old vehicle on scrap in kolhapur
viral message on social media 15 year old vehicle on scrap in kolhapur
Updated on

कोल्हापूर : अबब...पंधरा वर्षांवरील वाहने स्क्रॅप होणार? सात वर्षावरील वाहनांना ग्रीन टॅक्‍स लागणार? सध्या सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्र शासनाकडून नवीन स्क्रॅप पॉलिसी जाहीर होणार आहे. त्याबाबतचा सर्व कच्चा आराखडा तयार असून लवकरच (मार्च?) केंद्रसरकारमध्ये मसुद्या चर्चेस येणार आहे. तो मंजूर झाला तर काय होईल, त्याचा फायदा तोटा काय असेल याची माहितीही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पण खरोखरच ही पॉलिसी लागू झाली तर जिल्ह्यातील सुमारे पावणे पाच लाख वाहनांना याचा फटका बसू शकतो. मात्र याबाबत परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तूर्तास याबाबतची कोणतीही माहिती व आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे सांगण्यात आले. यामुळे सोशल मीडियावरील ही पोस्ट किती खरी किती खोटी हे लवकरच कळेल.

आधुनिक काळात लोकांचे उत्पन्न जस जसे वाढू लागले. तस तसे त्याच्या राहणीमानात बदल होत गेला. सायकलची जागा वाहनाने घेतली. आज घराघरांत मोटारसायकल, मोटारी दिसू लागल्या. जिल्ह्यातील वाहनांची संख्या आज १५ लाख ३५ हजारांहून अधिक झाली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)च्या कामाचाही भार वाढत आहे. पण सध्या पर्यावरणाचा विचार करून देशातील २.८० कोटी वाहने नव्या भंगार धोरणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १५ वर्षावरील वाहने कालबाह्य म्हणून भंगारात काढण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तशी जुनी वाहने वापरणाऱ्यांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. 

याबाबतचा कोणताही अधिकृत आदेश आरटीओ कार्यालयाला प्राप्त झालेले नसल्याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्याकडून सांगण्यात आले. पण जर भविष्यात १५ वर्षांवरील वाहने जर स्क्रॅप करण्याचा निर्णय झाला तर जिल्ह्यातील ४ लाख ७३ हजाराहून अधिक वाहनांना याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. संबधित वाहने भंगारात निघण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.