Vishalgad Controversy : 'ते' भाकीत करतात आणि दंगल होते; विशाळगड दंगलीनंतर महाडिकांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Vishalgad Controversy : ‘विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरात जी घटना घडली ती निंदनीयच आहे.'
Dhananjay Mahadik VS Satej Patil
Dhananjay Mahadik VS Satej Patilesakal
Updated on
Summary

माजी पालकमंत्र्यांनी आत्तापर्यंत दोन वेळा दंगल होईल असे भाकीत केले होते आणि त्यानंतर दोन्ही वेळा दंगल झाली, याची चौकशी झाली पाहिजे.

कोल्हापूर : माजी पालकमंत्र्यांनी दोन वेळा दंगल होणार, असे भाकीत केले आणि दोन्ही वेळेला दंगल झाली. त्यामुळे विशाळगड प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या दंगलीचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढले पाहिजे, अशी टीका खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर नाव न घेता केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Dhananjay Mahadik VS Satej Patil
विशाळगडावरील 'अतिक्रमण'चा वाद चिघळला! माजी खासदार संभाजीराजेंना अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्वच गड अतिक्रमणमुक्त करावेत, असे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार महाडिक म्हणाले, ‘विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरात जी घटना घडली ती निंदनीयच आहे. मात्र, हे का घडले याचा विचार केला पाहिजे. हा शिवभक्तांचा आक्रोश होता. वर्षानुवर्षे आंदोलन करूनही अतिक्रमण काढले जात नाही. मुळात ही अतिक्रमणे झाली तेव्हा राज्यात काँग्रेसचे राज्य होते. त्यावेळी कोण मंत्री होते? त्यांनी हे का थांबवले नाही?

काँग्रेस महाआघाडीचे नेते गजापुरात जाऊन बाधितांना मदत करून आले. तेथील हिंदूंना का मदत केली नाही. माजी पालकमंत्र्यांनी आत्तापर्यंत दोन वेळा दंगल होईल असे भाकीत केले होते आणि त्यानंतर दोन्ही वेळा दंगल झाली, याची चौकशी झाली पाहिजे. गजापूरमध्ये जी मोडतोड झाली ती पाहता हे कार्यकर्त्यांचे काम दिसत नाही. हत्यारे नेणे, घरामध्ये गॅसचा स्फोट करण्याचा प्रयत्न करणे हे सर्व पाहता हे काम सराईत लोकांचे दिसते.

हा पूर्वनियोजित कट दिसून येतो. जे आरोपी अटक केलेले आहेत, त्यातील तेरा जण कसबा बावड्यातील असल्याचे समजले. त्यामुळे या सर्व बाबी पोलिसांनी तपासल्या पाहिजेत. ‘ते’ पालकमंत्री असताना त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे पाडण्यासाठी काय केले. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घातले. यातून त्यांचा ढोंगीपणा सिद्ध झाला आहे.’ पत्रकार परिषदेला कृष्णराज महाडिक उपस्थित होते.

Dhananjay Mahadik VS Satej Patil
Muharram Festival : हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याची परंपरा आदर्श घेण्यासारखी; मंगळवेढ्यात 68 ठिकाणी पंजाची स्थापना

शिवभक्त अतिरेकी कसे...

महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील एक खासदार यांच्यावर टीका करताना महाडिक म्हणाले, ‘एक जण म्हणतात पाडा, दुसरे म्हणतात पाडू नका अशा पद्धतीने एकाच घरात दोन भूमिका कशा? हे कुटिल कारस्थान आहे. ‘त्यांनी’ शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधले, हे अत्यंत खेदजनक आहे. आमचे छत्रपती कान धरून उभे राहतात हे वेदनादायी. संसदेमध्ये राहुल गांधी हिंदू समाजाला हिंसक म्हणतात हीच इंडिया आघाडीचीही भूमिकाच आहे.’

...तर त्यांना तुम्हीच का अडवले नाही

महाडिक म्हणाले, ‘प्रशासनाने संभाजीराजेंना का अडवले नाही, असे म्हटले जात आहे. आमचा त्यांना सवाल आहे ते महाविकास आघाडीचे घटक आहेत तर त्यांना तुम्हीच का अडवले नाही. प्रत्येकवेळी सोयीच्या भूमिका घेण्याची त्यांची पद्धत आहे.’

‘उत्तर’ची जागा भाजपची

उत्तरमधून राजेश क्षीरसागर दोन वेळा आमदार झाले. त्यामुळे त्यांनी मतदारसंघावर दावा सांगणे स्वाभाविक आहे. मात्र, पोटनिवडणुकीत भाजपने येथे स्वबळावर ८० हजार मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचा दावा पक्का असल्याचे महाडिक म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com