Vishalgad Controversy : दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडवर कधी आला आणि कोठे राहिला? दंगलीनंतर काय म्हणाले मुश्रीफ?

Vishalgad Controversy Hasan Mushrif : विशाळगडावरून आता राजकारण न करता, शांततेत पूर्वपदावर येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
Vishalgad Controversy Hasan Mushrif
Vishalgad Controversy Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

संभाजीराजे यांनी पोलिसांना शांततेत आंदोलन करण्याचा शब्द दिला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबद्दल पोलिस गाफील राहिले आहेत का?

कोल्हापूर : कोल्हापुरात वारंवार होणाऱ्या दंगलीबाबत सर्वांच्याच चौकशीची गरज असल्याचे स्पष्ट मत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले. दरम्यान, दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडवर (Vishalgad Controversy) कधी आला, कोठे राहिला, त्यावेळी कोण पोलिस अधिकारी होते? यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर परिसरात झालेल्या जाळपोळ किंवा दंगलीची शासन पातळीवर चौकशी केली जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

आषाढी एकादशीनिमित्त कागल येथील विठ्ठल मंदिरात त्यांनी ‘विठ्ठला’चे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशाळगड अतिक्रमण किंवा दंगलीच्या निषेधार्थ काढल्या जाणाऱ्या मोर्चांना परवनगी देऊ नका, अशा सूचना दिल्या जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यात आणखी तेढ निर्माण होण्याऐवजी शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.

Vishalgad Controversy Hasan Mushrif
Vishalgad Controversy : 'ते' भाकीत करतात आणि दंगल होते; विशाळगड दंगलीनंतर महाडिकांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘जातीजातीमधील वातावरणामुळे कोल्हापूर जिल्हा बदनाम होत आहे. विशाळगड शांततेत अतिक्रमणमुक्त केले जाणार, असे सांगितले जात होते. मात्र, विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात दंगल झाली. यामध्ये पोलिस गाफील राहिले का? याचीही चौकशी केली जाणार आहे.’ दरम्यान, विशाळगडावरून आता राजकारण न करता, शांततेत पूर्वपदावर येईल यासाठी प्रयत्न केले जातील. चाळीस कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यांना अपेक्षित मदत केली जाईल. जाळपोळची पाहणी करण्यासाठी योग्य वेळी मी जाणार आहे.

संभाजीराजे यांनी पोलिसांना शांततेत आंदोलन करण्याचा शब्द दिला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबद्दल पोलिस गाफील राहिले आहेत का? नेमके काय झाले, याची चौकशी होईल, असेही ते म्हणाले. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लोकांना दिलासा दिला आहे. गजापूरवरून जिल्ह्यातील वातावरण तापू नये यासाठी प्रयत्न केला आहे. अशा घटना घडू नयेत, याची आता खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आता तर सात पक्षांमध्ये संधी...

अजित पवार गटाचे काही नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेवर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘निवडणुका आल्यानंतर कोणाला एका पक्षातून तिकीट मिळाले नाही, तर ते दुसऱ्या पक्षात जातात. ज्यांना जिथे संधी मिळेल तिथे जातात. आता तर सात पक्षांमध्ये संधी मिळते. त्यामुळे हे होत राहते.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com