Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसक आंदोलनात 2 कोटी 85 लाखांचं नुकसान; गजापुरातील बाधितांना शासनाकडून 25 हजारांची मदत

गजापूर येथील रविवारी (ता. १४) विशाळगड मुक्त करण्याच्या आंदोलनाला हिंसक (Vishalgad Riots) वळण लागले.
Vishalgad Riots
Vishalgad Riotsesakal
Updated on
Summary

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपासून अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गडावर राबवण्यात आली.

कोल्हापूर : गजापूर येथील रविवारी (ता. १४) विशाळगड मुक्त करण्याच्या आंदोलनाला हिंसक (Vishalgad Riots) वळण लागले. यामध्ये घरांची तोडफोड करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांच्या हस्ते ४१ घरांमधील ५६ कुटुंबांना घर दुरुस्तीसाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात आले.

Vishalgad Riots
Vishalgad Controversy : 'ते' भाकीत करतात आणि दंगल होते; विशाळगड दंगलीनंतर महाडिकांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

विशाळगडावरील अतिक्रमणमुक्त करण्यासाठी काही महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. रविवारी (ता. १४) संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी चलो विशाळगड असा नारा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत गेलेल्या जमावाने गजापुरातील घरांची मोडतोड केली. यामध्ये प्राथमिक निरीक्षणात सुमारे २ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

काल जिल्हाधिकाऱ्यांनी ५६ कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत दिली. या रकमेचा उपयोग त्यांना घराची दुरुस्ती, प्रापंचिक साहित्याची खरेदी यासाठी होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, स्थानिक महसूल अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Vishalgad Riots
Vishalgad Controversy : दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडवर कधी आला आणि कोठे राहिला? दंगलीनंतर काय म्हणाले मुश्रीफ?

मोहरम, आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम स्थगित

शाहूवाडी : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम आज मोहरम व आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज गडावर शांतता होती. विशाळगडावरील अतिक्रमणे काढावीत यासाठी १४ जुलै रोजी शिवभक्तांनी गडपायथ्यापर्यंत धडक देत आंदोलन केले होते.

त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपासून अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गडावर राबवण्यात आली. सोमवारी सत्तर, तर मंगळवारी दहा अतिक्रमणे हटवली.तिसऱ्या दिवशी मोहरम व आषाढी एकादशी या सणांच्या निमित्ताने अतिक्रमणे हटाव मोहीम थांबण्यात आली होती. त्यामुळे आज गडावर शांतता राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.