Sambhaji Raje: विशाळगड मोहीम फत्ते..! पक्षाकडून संभाजीराजे छत्रपती यांचा हिंदूपदपातशाह म्हणून उल्लेख

Kolhapur Vishalgad Update: स्वराज्य संघटनेच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
Sambhaji Raje
Sambhaji RajeeSakal
Updated on

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेची हाक देऊन ती हटवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाकडून त्यांचा उल्लेख हिंदूपदपातशाह असा करण्यात आला आहे. पण अशा स्वरुपाचा उल्लेख केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये संभाजीराजे छ्त्रपती यांचा आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापण्यात आला आहे. तसंच यावर मोठ्या फॉन्टमध्ये "हिंदूपदपातशाह छत्रपती संभाजी महाराज यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीची मोहिम फत्ते केल्याबद्दल सर्व शिवभक्तांच्यावतीनं हार्दिक अभिनंदन! विशाळगडावरील ७० हून अधिक अतिक्रमण जमिनदोस्त" असा मजकूर लिहिला आहे.

Sambhaji Raje
Mumbai Aqua Line Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिली भूमिगत मेट्रो 'या' दिवसापासून धावणार

स्वराज्य संघटनेच्या अधिकृत इन्स्टापेजवरुन ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. हिंदूपदपातशहा या शब्दाचा अर्थ हिंदूंचा सर्वोच्च राजा असा होतो. त्यामुळं या शब्दप्रयोगावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sambhaji Raje
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिण'साठी पैसे उकळणाऱ्या एजंटवर पहिला 'प्रहार'; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचा नारा देत संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर येण्याची हाक दिली होती. संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत विशाळगाडवर आलेल्या लोकांनी तिथं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. याठिकाणी तसंच गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये खासगी वाहन आणि घर उद्ध्वस्त करण्यात आली. याप्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.