छत्रपती शिवराय अन् 'विक्रमादित्य'वरील बोधचिन्ह..; अखंड लाकडात दोन बाय तीन फूट आकाराची साकारली कलाकृती

नुकतेच व्ही. एन. निट्टूरकर यांनी अखंड लाकडात दोन बाय तीन फूट आकाराची छत्रपती शिवरायांची कलाकृती साकारली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj and Vikramaditya Warships
Chhatrapati Shivaji Maharaj and Vikramaditya Warships esakal
Updated on
Summary

टूल अँड डायमेकर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर निट्टूरकर यांनी पुण्यातील एका कंपनीत आणि त्यानंतर कोल्हापुरातील काही कंपन्यांमध्‍ये काम केले.

कोल्हापूर : शिक्षण आयटीआय ‘टूल अँड डायमेकर’ ट्रेड पास. त्यानंतर काही ठिकाणी नोकरी केली. नोकरी करता करता फोटोग्राफीचा छंदही जोपासला. त्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली आणि पुढे पूर्णवेळ विविध डाईज, मोल्ड आणि कार्व्हिंगचा व्यवसाय सुरू केला. तांबे-पितळच नव्हे, तर सोन्या-चांदीतील डायपासून कुठल्याही धातू आणि दगड, फरशी, आदी माध्यमांतील कार्व्हिंगसाठी देशभरातून लोक त्यांच्याकडे येतात.

Chhatrapati Shivaji Maharaj and Vikramaditya Warships
Sangli Lok Sabha : षड्‍यंत्र रचून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचा घात केला; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

इतकेच नव्हे, तर भारतीय नौसेनेतील (Indian Navy) विक्रमादित्य युद्धनौकेवर अभिमानाने लावली गेलेली बोधचिन्हेही त्यांनीच साकारली आहेत. येथील व्ही. एन. निट्टूरकर यांचा हा प्रवास. दरम्यान, नुकतेच त्यांनी अखंड लाकडात दोन बाय तीन फूट आकाराची छत्रपती शिवरायांची कलाकृती साकारली आहे. इंडोस्कोपी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी इंडोस्कोपी मशीनचे मॅडिफिकेशनही त्यांनी केले असून, लवकरच त्याचे उत्पादन सुरू होणार आहे.

टूल अँड डायमेकर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर निट्टूरकर यांनी पुण्यातील एका कंपनीत आणि त्यानंतर कोल्हापुरातील काही कंपन्यांमध्‍ये काम केले. हेवी शीटमेटलचे कौशल्य त्यांनी त्यातून मिळवले. फोटोग्राफीसाठी कोरल ड्रॉ आणि इतर कौशल्ये पुढे आत्मसात केली आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारचे कला शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी डिझाईन्समध्ये हातखंडा मिळवला. इंजेक्शनल मोल्डिंग आणि थ्रीडी मॉडेल एक्स्पर्टस्‌ म्हणून त्यांनी आता लौकिक मिळवला आहे.

सोन्या-चांदीच्या लहान मण्यांच्या डाईजपासून ते ट्रक, बस, जहाज आणि विमानांच्या कुठल्याही पार्टस्‌ची डिझाईन्स ते साकारतात. मंडलिक वसाहतीतून पुढे ओढ्यावरील रेणुका मंदिराकडे जाताना एका झाडाखाली त्यांची छोटीशी मय टूलिंग नावाची फर्म आहे आणि तेथूनच देशभरात ही सारी डिझाईन्स आणि कलाकृती जातात.

Chhatrapati Shivaji Maharaj and Vikramaditya Warships
'4 जूनला धमाका होणार आणि मी तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार'; नारायण राणेंना विश्वास

कोल्हापुरातच मिळते सोल्युशन...

भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, फिरता रंगमंच असो किंवा कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही गोष्टीसाठी एखादे ‘सोल्युशन’ हवे असेल, तर ते कोल्हापुरातील कलाकार, तंत्रज्ञ हमखास देतात. विक्रमादित्य युद्धनौकेवरील बोधचिन्हाचे कामही निट्टूरकर यांच्याकडे असेच आले आणि त्यांनी कमी वेळेत, अत्यंत सुबक पद्धतीने ते पूर्ण केले. सध्या या नौकेवर असणारी सहा बोधचिन्हे निट्टूरकर यांनी तयार केली आहेत. इंडोस्कोपी मशीनमधील त्रुटी दूर करताना त्यांनी सर्वंकष अभ्यास केला आणि त्याचे मॉडिफिकेशन केले आहे.

भारतीय आरमाराचे जनक

छत्रपती शिवाजी महाराजांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखतो. भारतीय आरमारात आयएनएस विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका दोन वर्षांपूर्वी दाखल झाली. यानिमित्ताने नव्या नौदल ध्वजाचेही अनावरण झाले. मात्र, तत्पूर्वीपासून आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आहे. दहा वर्षांपूर्वी ती भारतीय आरमारात दाखल झाली आणि त्यावरील बोधचिन्हे कलापुरातून निर्माण झाली आहेत. याबाबतची माहिती अजूनही कोल्हापूरकरांनाही नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj and Vikramaditya Warships
Ganpatipule Tourism : गणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकींमुळे मोठी घट; दिवसभरात 10 हजार पर्यटकांची नोंद

मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्याने ‘टेक्निकल’ विषय होताच आणि पुढे ‘आयटीआय’मधील शिक्षण. केवळ याच बळावर पुढे नवनवीन गोष्टी करत गेलो. आवश्यकतेनुसार विविध कौशल्ये आत्मसात केली. त्यामुळे अगदी लहानात लहान काम असो किंवा ट्रक, जहाज, विमानांसाठी आवश्यक पार्टस्‌च्या डाईज, डिझाईन्सचे कुठलेही काम तितक्याच आत्मविश्वासाने पूर्ण करू शकतो.

- व्ही. एन. निट्टूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.