'लाडकी बहीण'साठी प्रभागातील नेते झाले 'ॲक्‍टिव्ह'; मतांच्या गठ्ठ्यासाठी घेऊन ठेवले अनेक लाभार्थ्यांचे अर्ज

शासनाने जाहीर केलेल्या योजनेतील लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
Majhi ladki Bahin Yojana Kolhapur
Majhi ladki Bahin Yojana Kolhapuresakal
Updated on
Summary

आपापल्या प्रभागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास त्याचा फायदा आपल्या महापालिकेच्या तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही होईल हा विचार केला आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Majhi ladki Bahin Yojana) आपापल्या प्रभागातील लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी अनेकजण ‘ॲक्‍टिव्ह’ झाले आहेत. ‘मतांचा गठ्ठा’ बांधून ठेवण्यासाठी अनेक लाभार्थ्यांचे अर्ज घेऊन ठेवले आहेत. त्यांना अर्ज भरून देण्याची सोय करून दिली आहे. त्रयस्थ यंत्रणेच्या हातात देऊन हेलपाटे मारण्यापेक्षा महिलाही (Women) आपल्या भागातील ‘साहेबां’कडे अर्ज देण्यास प्राधान्य देत आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या योजनेतील लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना अर्ज करण्यास सांगितले आहे. ऑनलाईन अपलोड करण्यासाठी यंत्रणा आवश्‍यक आहे. पण, त्यासाठी ऑफलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. ही बाब लक्षात येताच अनेकजणांनी पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत.

Majhi ladki Bahin Yojana Kolhapur
विशाळगडावर आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतो, पण..; मुश्रीफांना दंगलीची माहिती देताना मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर

आपापल्या प्रभागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास त्याचा फायदा आपल्या महापालिकेच्या तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही होईल हा विचार केला आहे. त्यामुळे काही पक्षांकडून अर्ज भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी कुठे अर्ज भरून द्यावेत, याचीही माहिती दिली आहे. याशिवाय काही नेत्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांचा वापर करून आपल्या भागातील घरात जाऊन अर्ज स्वीकारण्याची यंत्रणा लावली आहे. त्यांच्याकडून फक्त आवश्‍यक कागदपत्रे दिली की अर्ज भरून घेण्याचीही सोय आहे.

याबरोबरच महापालिका निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांनी आपली यंत्रणा लावली आहे. त्यांच्याकडे अर्ज भरून घेऊन प्रभागात फिरणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेला ते अर्ज एकत्रित देण्याचे नियोजन केले आहे. यातून आपले मतदार इतरांकडे सरकू नयेत याची काळजी घेतली जात आहे. अशा ‘ॲक्‍टिव्ह’ बनलेल्या इच्छुक तसेच ‘माजीं’मुळे प्रभागात ‘लाडकी बहीण’ योजना घराघरांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. पात्र असूनही ज्यांचे अर्ज पोहोचणार नव्हते, त्यांचेही अर्ज आता शासनाकडे जाणार असल्याने लाभार्थींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Majhi ladki Bahin Yojana Kolhapur
वाघनखांबाबत विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांच्या मेंदूचा शिंदेंनी गंज काढावा; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

हेतूबद्दल शंका?

अनेकजण आपल्या भागातील महिलांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर काहीजण त्याचा उलटा लाभ घेण्याचीही शक्यता असल्याची चर्चा आहे. कारण काहींकडे दिलेले अर्ज अजून अपलोड झालेले नाहीत. त्यांना लाभ मिळाला नाही तर त्या महिलांची मते वेगळी बनण्याची शक्यता आहे. यामुळे कोण, कशासाठी काम करतो यावर कितींना लाभ मिळणार, कुणाला लाभ मिळणार नाही, हे ठरेल अशी महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दाखल्यासाठी हेलपाटे

लाभार्थ्यांना जन्मतारखेचा दाखला द्यावा लागतो. त्यासाठी जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला हवा असतो. ज्यांची जन्मतारीख नाही, त्यांना बऱ्याच अडचणी आहेत. शाळेत गेलेल्यांचा दाखला मिळवण्यासाठी त्या-त्या शाळेत जावे लागते. महापालिकेच्या शाळांमध्येही दाखले घेण्यासाठी येतात. येथील काही शाळा बंद झाल्या असून त्यांचे जुने दप्तरच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी होत आहेत. तर काही ठिकाणी ‘अर्थ’कारण वेगावल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.