कोल्हापूर : असे आले कात्यायनीपासून थेट अंबाबाईला पाणी!

कोल्हापूर : असे आले कात्यायनीपासून थेट अंबाबाईला पाणी!
Updated on

कोल्हापूर : कात्यायनी मंदिरापासून जयंती नदीचा उगम होतो. अंबाबाई मंदिराचे परिसरात काशीविश्वेश्वर व मनकर्णिका कुंड होते. जवळच कपिलतीर्थ, आजूबाजूला अनेक विहिरी, आड असूनही अंबाबाईच्या पूजेला पाणी का उपलब्ध झाले नसेल?

Water directly from Katyayani to Ambabai kolhapur historical marathi news

शहराच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत राहिली. अत्यंत अरुंद बोळवजा रस्ते असलेली ही वस्ती होती. जुन्या पद्धतीची मानवी मदतीने मैला वाहून न्यावी लागणारी शौचालय होती. पाण्याचा वापर कमी होत असला तरी तयार झालेले सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबलेल्या असायच्या. पायी जाणाऱ्यांची मोठी तारांबळ होती. याच दरम्यान पाऊस कमी पडला तर पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच जाणवले असेल. १७६० ते ७० चे दरम्यान पुण्याचे बाबूराव केशव ठाकूर हे व्यापारी कोल्हापूरमध्ये व्यापाराच्या निमित्ताने येत.

अंबाबाईवर असलेली श्रद्धा आणि इथली पाण्याची परिस्थिती त्यांच्या लक्षात आल्यानंतर कात्यायनी देवीच्या मंदिरासमोरच्या कुंडापासून दगड चुन्याच्या पक्क्या पाटातून पाणी आणणारी योजनेचे स्वतःकडील तीन लाख रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण केले. याच ठिकाणी जयंती नदीचा उगम होतो हे आपल्याला माहीत आहे. तेथील बारमाही वाहणारे पाण्याचा पाट कात्यायनी, कळंबा, तपोवन, संभाजीनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी ते अंबाबाई मंदिर असा या मुख्य मार्गाने टेकडीच्या उंच भागावरून आलेला असावा. ठाकुरांनी अंबाबाई व विठ्ठल मंदिरात दोन दोन कुंड बांधून त्यामध्ये पाटातून आणलेले पाणी सोडण्यात आले. शहरातील जवळपास बत्तीस विहिरीतही पाणी सोडण्यात आले.

नंगिवली दर्ग्याच्याजवळ मोठी पाणी साठवण्याची टाकी बांधायला जागा देऊ केली. या योजनेच्या देखभालीसाठी वीस हजार रुपये एका सावकाराकडे ठेव ठेवली. त्यानंतर १७८८ मध्ये तटबंदी बांधून झाल्यानंतर पाणीपुरवठा व सांडपाणी प्रश्न आणखी बिकट झाला असावा. नंतरच्या काळात आठ हजार लोकांना तटबंदीच्या बाहेर विस्थापित करावे लागल्याचा उल्लेख ग्रॅहॅमच्या सांखिकी अहवालात आहे.

अलीकडे कळंबा तलावातील गाळ काढण्यासाठीचे काम सुरू असताना या पाटाचा काही भाग सापडला. तब्बल अडीचशे वर्षानंतरही हा दगडी पाट भक्कम होता. प्रत्येक थोड्या अंतरावर गाळ काढण्यासाठी मोऱ्या असलेला हा पाट आदर्श जल व्यवस्थापनाचा नमुना होता. उतार आणि दाब यामुळे हे पाणी सर्व शहरात पोचले. काही विहिरीपर्यंत जाणाऱ्या काही वाहिन्या खापराच्या तयार केलेल्या होत्या.

मूळ योजना पथदर्शी

करवीर संस्थानचा स्वतंत्र कारभार आणि शत्रूशी सामना करावा लागलेला काळ हा काहीसा विस्कळीतपणा आणणारा असावा. मात्र, त्याही काळात जलसमृध्दी कायम राहिली. आज त्या योजनेत सुधारणा झाली असली तरी जलअभियांत्रिकी शास्त्राप्रमाणे ही मूळ योजना पथदर्शी ठरली आहे.

Water directly from Katyayani to Ambabai kolhapur historical marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.