कळंबा : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोचली आहे. पुराचे पाणी बालिंगा, शिंगणापूर, नागदेवाडी उपसा केंद्रात शिरले. पावसाने उघडीप दिल्याने संथ गतीने पूर ओसरत आहे. तरीही पावसाळ्याचे दीड महिने शिल्लक असून, पूरपस्थितीचे सावट गडद आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका प्रशासनाने कळंबा तलावातून टॅंकरद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात शहराला महापुराचा विळखा बसल्यामुळे शहरासह उपनगरात पाणीपुरवठा करणारी तिन्ही उपसा केंद्र पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यामुळे पंचवीस दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी कळंबा तलावातून सुमारे 3000 टॅंकर पाणी उपसा करून कळंबा फिल्टर हाऊसद्वारे शहराला वितरित करण्यात आले.आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोचली. पुराचे पाणी तीन पंप स्टेशन, शहर व उपनगरातील अनेक भागात शिरले आहे. त्यामुळे पुन्हा महापूरस्थिती निर्माण होण्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. काही कारणाने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला तर कळंबा तलावाचा आधार घेतला जाणार आहे. महापालिका, सहकारी, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती व भाडेतत्त्वावर टॅंकर घेऊन कळंबा तलावातून पाणीउपसा करून कळंबा फिल्टर हाऊसद्वारे शहराला व उपनगराला पाणीपुरवठा करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी भाडेतत्त्वावरील टॅंकर घेण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान दमदार पाऊस पडल्यामुळे कळंबा तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे. तसेच तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे.
पाणी वितरणाचे नियोजन हवे
मागील वर्षाच्या पावसाळ्यात पाणीपुरवठा करणारे टॅंकर कमी पडत असल्यामुळे नियोजन कोलमडले होते. तसेच कळंबा फिल्टर हाऊस येथे टॅंकरच्या रांगा लागल्या होत्या. हा पूर्वाअनुभव लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहराला व उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी वितरणाचे नियोजन व टॅंकरची संख्या वाढवण्याची गरज आहे.
पूरपरिस्थितीत कळंबा फिल्टर हाऊसमधून शहराला,उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी भाडेतत्त्वावरील टॅंकर टेंडर प्रक्रिया राबवली आहे.
- भास्कर कुंभार, प्रभारी जल अभियंता
कळंबा गावासाठी वर्षभर पुरेल इतका तलावामध्ये राखीव पाणीसाठा शिल्लक ठेवून महापालिकेने पाणी उपसा करावा.
रोहित मिरजे, उपसरपंच,
-संग्राम चौगुले, राजश्री टोपकर, सदस्य.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.