लाॅकडाऊनमध्येही अशा जुळल्या त्यांच्या रेशीम गाठी 

wedding ceremony in lock lockdown at kolhapur
wedding ceremony in lock lockdown at kolhapur
Updated on

शिरोली दुमाला (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता विवाह सोहळा झाला. सावर्डे दुमालातील माजी मुख्याध्यापक आनंदा पाटील यांचे नातू व उपसरपंच संतोषकुमार पाटील यांचे चिरंजीव संग्राम यांचा विवाह घानवडेतील विठ्ठल वीर यांची कन्या स्वाती हिच्याशी साधेपणाने सोमवारी सात माणसांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पाटील कुटुंबाकडून कोरोनाविरुद्धच्या मदतकार्यासाठी जिल्हा आपत्ती कार्यालयास ११,१११ रुपयांचा मदत निधीचा धनादेश दिला. 


सोशल डिस्टन्सिंग राखत विठ्ठल मंदिरातील सोहळ्यास वधू-वरांकडील तीन-तीन माणसे व भटजी असे मोजके लोकच उपस्थित होते. वराचे आजी, आजोबा, चुलते यांनी घरातूच अक्षता टाकल्या. नवी मुंबईत कोषागार लेखा लिपिक असलेला वराचा भाऊ अमोल यांनीही व्हिडिओ कॉलिंगद्वारेच अक्षता टाकून आशीर्वाद दिले. विवाहानंतर करवीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदेश भोईटे, यशदा पुणे प्रशिक्षक अरविंद कांबळे, ग्रामसेवक एस. जी. वाडकर, सरपंच सुवर्णा कारंडे, कुंडलिक कारंडे, ग्रा. पं. सदस्य पंढरीनाथ मोहिते, पोलिसपाटील पंकज गुरव यांच्या उपस्थितीत जिल्हा आपत्ती कार्यालयास मदत निधीचा चेक ग्रामपंचायतकडे सुपूर्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.