कोल्हापूर : सव्वा तीन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

सांगली जिल्ह्यातील सहा जणांना अटक
vomit of whale fish
vomit of whale fishsakal
Updated on

कोल्हापूर : व्हेल माशाच्‍या(whale fish ) उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना कोल्हापूर वन विभागाने(kolhapur forest department) आज अटक केली. त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. उलटीची अंदाजे किंमत तीन कोटी २५ लाख असल्याचा अंदाज आहे. कारवाईत संशयितांकडून आणखी पाच लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. विश्वनाथ वामन नामदास (मोरेवाडी), उदय जाधव, अस्लम मुजावर (तिघेही रा. खानापूर), अल्ताफ मल्ला (हाळवी, ता. तासगाव), रफिक सनदी (टाकळी रोड, मिरज), किस्मत नदाफ (वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्वांना उद्या (ता. १४) न्यायालयात हजर करण्यात(Will be produced in court) येणार आहे.

vomit of whale fish
कोल्हापूर : देशी चुना नामशेष होण्याच्या मार्गावर

व्हेल माशाची उलटी (vomit of whale fish)विकण्यासाठी काही तरुण कोल्हापुरात येणार असल्याची माहिती वनपथकाला मिळाली. त्यानुसार वनपथकातील भाटे यांनी बनावट ग्राहक बनून संबंधित तरुणांशी संपर्क केला. त्यावेळी तरुण उलटी विकणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार भाटे यांनी या तरुणांना दसरा चौकात बोलावले. दसरा चौकात भाटे यांनी तरुणांची भेट घेऊन पैसे दाखवले तसेच उलटी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर संबंधित तरुणांनी त्यांना न्यू पॅलेस परिसरात येण्यास सांगितले. याच वेळी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले. वनपथकाच्या अधिकाऱ्यांनी न्यू पॅलेसजवळ या तरुणांची भेट घेतली. यावेळी पैस देऊन उलटी विकत असल्याचे दिसताच या सहा जणांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर रितसर गुन्हा नोंद केला आहे.

vomit of whale fish
औरंगाबाद : आज महामेट्रोचा होणार कार्यारंभ

कारवाईत उप वन संरक्षक आर. आर. काळे, सहायक सुनील निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, आर. एस. कांबळे, रोहन भाटे, वनपाल विजय पाटील, संदीप शिंदे, आर. एस. मुल्लाणी, एस. एस. हजारे, सागर पटकारे, सुनील खोत यांनी सहभाग घेतला. सहायक फौजदार नेताजी डोंगरे, हवालदार उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, वैशाली पाटील आदींनीही सहभाग घेतला. या सहा जणांकडून चार मोबार्इल, एक चारचाकी वाहन, दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.