लाडकी बहीण योजनेनंतर आता 'लाडकी म्हैस' योजना लवकरच सुरू होणार? काय म्हणाले मुश्रीफ?

गोकुळ हा देशात आदर्श वाटावा असा दूध संघ आहे. कोणीही गोकुळवर टीका करू नये.
Guardian Minister Hasan Mushrif
Guardian Minister Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रात गाय दुधालाच ठरवीक काळासाठी अनुदान मिळते. पाच राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला.

कोल्हापूर : महाविकास आघाडीत असतानाही आणि आता महायुतीत असतानाही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढवणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

गोकुळ हा देशात आदर्श वाटावा असा दूध संघ आहे. कोणीही गोकुळवर टीका करू नये. गोकुळ विरोधकांनीही चालवलाच आणि आम्ही चालवत आहोत. विरोधकांसोबत आमदार सतेज पाटील आणि माझी दोन तीन मुद्यांवर लढाई होती. यामध्ये, आम्ही उत्पादकांना दोन रुपये दर देण्याची ग्वाही दिली होती, पण आम्ही प्रतिलिटर ११ रुपये भरघोस दर दिल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Guardian Minister Hasan Mushrif
Prithviraj Chavan : 'या' पालकमंत्र्यांविरोधात महाविकास आघाडी तगडा उमेदवार देणार; पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा

‘गोकुळ’च्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचे उद्‌घाटन पालकमंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका वेगळ्या लढवल्या जातात. निवडणुकानंतर युती होते आणि सत्ता स्थापन केली जाते. महाविकास आघाडीतही अशीच निवडणूक लढवून एकत्र येत होतो. आताही त्याच पद्धतीने निवडणूक लढवली जाईल.’

‘लाडकी म्हैस’ योजना...

महाराष्ट्रात गाय दुधालाच ठरवीक काळासाठी अनुदान मिळते. पाच राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला. यावर श्री मुश्रीफ यांनी आता लाडकी बहीण योजनेतून अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर म्हैस दुधाला अनुदान मिळण्यासाठी ‘लाडकी म्हैस’ योजना लवकरच सुरू होते का? पाहायला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.