''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून कोणी कोणत्या ठिकाणी लढायचे, हा निर्णय घेतला जाईल.''
कोल्हापूर : ‘राज्यात कोणती जागा कोण लढवेल, हे वरिष्ठ नेते ठरवतील. ग्राऊंड रिपोर्ट काय असेल, कार्यकर्त्यांना काय हवे, याची माहिती जनसंवाद यात्रेतून घेत आहे. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाईल. विरोधकांनी लाडक्या बहिणीचा (Ladaki Bahin Yojana) धसका घेतला आहे,’ असेही खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.