लेसरमुळे डोळ्यांतून रक्तस्राव झाला किंवा दृष्टी कमी झाली तर त्यावर पाणी मारणे किंवा अन्य घरगुती उपाय करू नयेत.
कोल्हापूर : मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेसरच्या लहरी (वेव्हज) डोळ्यांसाठी घातकच असतात, असे मत ज्येष्ठ नेत्रविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी व्यक्त केले. डॉ. लहाने म्हणाले, ‘लेसर लाईट (Laser light) जे वापरले जातात, त्याच्या ‘अल्ट्रा व्हायलट’ची लांबी किती, यावर त्याची तीव्रता ठरते. एक, दोन आणि तीन, तीन-बी, चार, चार-बी असे त्याचे सात प्रकार आहेत.