शाहूंच्या नगरीत माणुसकीचा वसा; व्हॉट्स अॅप ग्रुप द्वारे कोल्हापूरकरांना आधार

ऊर्जा मैत्रीची, हाक सोबतीची व्हॉट्स अॅप ग्रुपची कोरोनाकाळात मदत
शाहूंच्या नगरीत माणुसकीचा वसा; व्हॉट्स अॅप ग्रुप द्वारे कोल्हापूरकरांना आधार
Updated on

कोल्हापूर : कोरोना रुग्णासाठी (covid-19) वेळेवर बेड, आँक्सिजन, (oxygen) व्हेन्टीलेटर (ventilator bed) उपलब्ध होत नसल्याने कुटुंबियांची होणारी धावाधाव वेदनादायी आहे. घरातल्या सदस्याला, नातेवाईकाला अथवा मित्राला उपचार मिळवून देण्यासाठी लोकांचा धावा सुरु असतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. परंतू या कठीण काळात आशेचा किरण म्हणुन शिवाजी विद्यापीठात (shivaji university) शिकुन बाहेर पडलेल्या मित्रांनी 'उर्जा मैत्रीची, हाक सोबतीची' या व्हॉट्स अॅप (what's group) ग्रुपच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला येत आहेत. गरजूंसाठी बेडची, ऑक्सिजनची उपलब्धता ते या ग्रुपद्वारे कळवत आहेत.

शिक्षण झाल्यानंतर अनेकांनी नोकरीची वाट धरली, व्यवसाय थाटला पण मैत्रीचा गोडवा कायम राहावा यासाठी 'ऊर्जा मैत्रीची' हा व्हॉट्स अॅप ग्रुप काढण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून मित्र एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत होते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत अनेकांच्या मदतीला येत होते. कोरोनाने केलेली वाताहत पाहून या मित्रांनी या ग्रुपचे रुपांतर मदत केंद्रातच केले. 'उर्जा मैत्रीची, हाक सोबतीची' असे ग्रुपचे नाव बदलत कोव्हिड वॉर ग्रुप (covid war group) संचलित केला आहे.

कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई या ठिकाणी या ग्रुपचे सदस्य वास्तव्यास आहेत. दुर्गम भागातील तसेच शहरातील अनेक रुग्णांना मदतीची गरज असल्याचे समजताच या ग्रुपचे सदस्य कामाला लागतात. विविध दवाखान्यात, कोविड सेंटरमध्ये (covid centers) तसेच संबंधित यंत्रणेशी संपर्क करुन उपलब्धतेची माहिती घेतात. ती माहिती ग्रुपवर टाकुन गरजुंपर्यंत पोहचवली जात आहे. या माध्यमातून त्या रुग्णांची धावाधाव न होता त्याला योग्य माहिती मिळत आहे. यामुळे काही दिवसांत या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

शाहूंच्या नगरीत माणुसकीचा वसा; व्हॉट्स अॅप ग्रुप द्वारे कोल्हापूरकरांना आधार
शववाहिकांवरचा ताण वाढला; मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना पहावी लागतेय वाट

ऑक्सिजन, व्हेंन्टीलेटर बेड तसेच रक्ताची, प्लाझ्माची गरज या अत्यावश्यक बाबींची अपडेट ग्रुपवर सर्व सदस्य टाकतात. जोपर्यंत वरील गरज उपलब्ध होत नाही तोवर ग्रुप मधील सदस्य पाठपुरावा करतात. हे अपडेट स्टेट्सच्या माध्यमातून फॉर्वर्ड केले जाते. या उपक्रमात फेसबुकचाही उपयोग होत आहे. दवाखाना निहाय माहिती याद्वारे दिली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व जेवणाची सोय होत नसेल तर लगेच ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मोफत सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ग्रुप मधील सदस्य मंत्रालय, एस.टी, आयकर, पोलिस, महावितरण, महसुल, पाटबंधारे अशा विविध खात्यात आहेत तसेच काहीजण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. सचिन लोंढे, काशिनाथ शेळके, राजेश सातपुते, निखिल झोरे, निवास पाटील, विशाल पाटील, धनंजय बच्चे, अनंत गिरिगोसावी, प्रदिप तानुगडे, दत्तात्रय कदम, निलेश झोरे, जयवंत भोसले, मंतेश काटगर, उत्तम पोवार, रणजित चौगुले, अमोल कांबळे, तुषार वारके, शैलेश चंदूरकर, अनिल पाटील, पंकज पाटील आदी सदस्य या कामात तत्पर असतात. व्हॉट्स अॅप सारख्या माध्यमाचा योग्य वापर करुन या महामारीत माणुसकीचा गंध ताजा ठेवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

शाहूंच्या नगरीत माणुसकीचा वसा; व्हॉट्स अॅप ग्रुप द्वारे कोल्हापूरकरांना आधार
Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का ?

"माणुसकी टिकेल तर माणूस टिकेल. राजर्षी शाहू महाराजांचा वसा आणि वारसा समोर ठेवून आमचे हे कार्य सुरु आहे. या कठीण काळात प्रत्येकाला आधाराची गरज आहे. तेच काम आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत. यासाठी सर्व मित्रांची साथ लाभत आहे. युवकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करुन लोकांना आधार द्यावा."

- सुनिल दळवी,ग्रुप अॅडमीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.