समाजाच्या दातृत्वातून साकारले सचिनचे घर

समाजाच्या दातृत्वातून साकारले सचिनचे घर
Updated on
Summary

'नंतर नविन घर बांधू, आता लोकांना वाचवतोय' असा निरोप त्यांने पत्नीला दिला.

शिंगणापूर : दोन वर्षापूर्वी पंचगंगेच्या महापुरात त्याचे घर जमीनदोस्त झाले. बायको-मुलं उघड्यावर आली. पण, तो मात्र पुरात अडकलेल्या लोकांना वाचवत होता. व्हाईट आर्मीचा जवान सचिन भोसले असे त्याचे नाव. शिंगणापूर येथे राहणाऱ्या सचिनवर ओढवलेले संकट सकाळने मांडले अन् मदतीचे हजारो हात सचिनचे घर उभारण्यासाठी पुढे आले. सकाळने पाठपुरावा करत सचिला मदत मिळवून दिली. समाजाच्या दातृत्वाच्या जोरावर सचिनचे टोलेजंग घर उभारले असून, नुकताच गृहप्रवेश झाला.

ऑगस्ट २०१९ च्या महापुरात शिरोळमध्ये पाण्यात बुडालेलल्या गावांमध्ये बचाव कार्यात सचिन व्यस्त होता तेव्हा त्याचे घर कोलमडल्याचे त्याला समजले. पत्नी, दोन मुली उघड्यावर आल्या; पण तो मदत कार्यातच राहिला. 'नंतर नविन घर बांधू, आता लोकांना वाचवतोय' असा निरोप त्यांने पत्नीला दिला.

समाजाच्या दातृत्वातून साकारले सचिनचे घर
पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC

सचिन गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचं काम करतो. त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालवतो; पण कधी कोणी संकटात सापडलं की, मदत करायला हा सर्वात आधी पोहोचतो. अनेक आपत्कालीन परिस्थितीत सचिन धावला आहे. संकटातील अनेक जीव त्याने वाचवले आहेत. उत्तराखंडचा प्रलय, केरळचा पूर, माळीणची घटना, तिवरे धरणाची दुर्घटना ते कोल्हापूरचा महापूर. सकाळने सचिनची ही गोष्ट समाजापुढे आणत त्याला हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा केला आणि मदतीचे हजारो हात पुढे आले.

यांनी दिला मदतीचा हात

सकाळचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच दुबई, मुंबई, पुण्यातून मदत मिळाली. शिंगणापुरचे ग्रामस्थ, व्हाईट आर्मी, माजी शिक्षक-कर्मचारी समिती, राजस्थानी जैन समाज, वाहन खरेदी विक्री संघटना, न्यू हायस्कुलचे विद्यार्थी, नातेवाईक, शासनानेही मदतीचा हात दिला. पाटील गल्लीने वेळोवेळी बळ दिले. याच आधारावर विटेवर विटेवर रचत गेली. सचिनच्या मित्रांनी श्रमदान करुन घर उभारणीला हातभार लावला आणि त्याचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.

समाजाच्या दातृत्वातून साकारले सचिनचे घर
PM Care Fund सरकाचा निधी नाही, दिल्ली उच्च न्यायालयात खुलासा

"मी केलेल्या कामापेक्षा मला दाणशूर समाजाने चौपट दिले. उघड्यावर आलेला संसार नव्या घरात परत आनंदाने सुरू झाला आहे. आता जनसेवा मी जोमात करेन. सकाळने माझा प्रश्न सातत्याने मांडल्याने माझे घर उभारले."

- सचिन भोसले, जवान, व्हाईट आर्मी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()