Samarjeet Ghatage: पवारांची खेळी मुश्रीफांना भारी पडणार ? कोण आहेत समरजित घाटगे, आधी समजून घ्या कागलचं गटातटाच राजकारण

Who is samarjeet Ghatge: कोण आहेत हे समरजित घाटगे, ते कागलचे बाहूबली म्हणवल्या जाणाऱ्या मुश्रीफांना हरवतील का?
who is samarjeet ghatge
who is samarjeet ghatgeesakal
Updated on

शरद पवारांनी नुकताच भाजपला दणका दिला. कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष कागलचे तरुणतुर्क नेते समरजितसिंह घाटगे यांनी कमळ खाली ठेवून तुतारी हाती घेतली. मविआने विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्या आहेतच पण हा उमेदवार पळवून शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना शह दिला आहे. कोण आहेत हे समरजित घाटगे, ते कागलचे बाहूबली म्हणवल्या जाणाऱ्या मुश्रीफांना हरवतील का?

एकवेळ युपी बिहारचे राजकारण कळेल पण कागलचं राजकारण कोणाला कळणार नाही. आजकाल शिंदे गट, ठाकरे गट पवार गट यामुळे 'गटातटाचे राजकारण' हा संपूर्ण राज्यासाठी परवलीचा शब्द बनला आहे पण कागलात शाळेत जाणारं पोरगं सुद्धा आपला गट कोणता हे छातीठोकपणे मिरवत असतं. एकेकाळी दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या या तालुक्यात काळम्मावाडीच्या धरणाचे पाणी आले आणि साखरेच्या राजकारणाने उभारी घेतली. त्यामुळे इथल्या पाण्यातदेखील बंडखोरी आहे.

कागल मध्ये स्पष्टपणे सांगायचं झालं तर ४ गट आहेत. प्रत्येक गट आपापले साखर कारखाने सांभाळून कार्यकर्त्यांची फौज बाळगून आहे. एक गट माजी खासदार संजय मंडलिकांचा, एक आमदार मुश्रीफांचा, एक समरजित घाटगे यांचा आणि एक संजय घाटगे यांचा.

who is samarjeet ghatge
Sanjay Ghatge : 'हसन मुश्रीफ तुम्ही आल्लाची शपथ घेऊन सांगा, की एक रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय?'

यातले मुख्य गट दोन. मंडलिक आणि घाटगे. पूर्वापार या दोन गटात दुश्मनी. सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे.

कागलचे घाटगे म्हणजे कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे जनक घराणे. फक्त कागल नाही तर संपूर्ण जिल्ह्यात या घराण्याला मान दिला जातो. कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या रूपात राजघराण्यातील पहिली व्यक्ती राजकारणात उतरली, १९७८ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना आपला ठसा उमटवला. शाहू साखर कारखाना उभारून आदर्श कारखाना कसं चालवायचा याचे उदाहरण देशभरात ठेवले. आता चर्चेत आलेले समरजितसिंह घाटगे यांचेच सुपुत्र.

सदाशिवराव मंडलिक

कागलचा दूसरा महत्त्वाचा गट मंडलिकांचा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सदाशिवराव मंडलिक नावाचा तरुण जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत उतरला पुढे आमदारकी, मंत्रिपद खासदारकी सगळी पदे जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले. सलग तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार बनले. वेळप्रसंगी शरद पवारांशी पंगा घेतला, पक्षाशी बंड केलं पण राजकारणावरची पकड कधीच ढिल्ली होऊ दिली नाही. त्यांचेच पट्टशिष्य म्हणजे हसन मुश्रीफ.

हसन मुश्रीफ

कागल मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा गुरु शिष्याचा जोडा प्रचंड फेमस होता. सुरवातीपासून हसन मुश्रीफ म्हणजे एक चळवळ्या कार्यकर्ता. विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखान्याच्या उभारणीपासून हे नाव चर्चेत येऊ लागलं. कायम सभोवती असणारं लोकांचे जाळे हे मुश्रीफांचे वैशिष्ट्य. त्यांच्या आणि जनतेच्या मध्ये कधी जातधर्म आडवे आले नाही.

मंडलिकांनी या कार्यकर्त्याला हेरलं आणि त्यांना हाताशी धरून कागल वर राज्य केलं. खासदारकी मंडलिकांची आणि आमदारकी मुश्रीफांची अशी वाटणी देखील झाली. पण पुढे या दोघांच्यात हमिदवाडा कारखान्यावरून भांडण झालं ते हसन मुश्रीफ यांच्या नव्या गटाचा जन्म झाला. सदाशिवरावांनी आपल्या मुलाला म्हणजेच संजय मंडलिक यांना पुढे आणलं. तर शरद पवार मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे राहिले. राज्यात मोठी मंत्रीपदे दिली.

मधल्या काळात मुश्रीफांवर भाजपकडून अनेक आरोप झाले. ईडीची चौकशी झाली. पण पुढे पवारांसाठी डोळ्यात अश्रु आणणारे मुश्रीफ अजित पवारांच्या गटात गेले. कागलमध्ये महायुतीचं तिकीट त्यानाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

who is samarjeet ghatge
Samarjeet Ghatge: समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू

हे तीन सोडून अजून एक गट कागल मध्ये आहे तो संजय बाबा घाटगे यांचा.

संजय बाबा घाटगे यांनी एकदा नाही दोन वेळा नाही तर तब्बल ७ वेळा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर कागलची विधानसभा लढवली. विक्रमसिंह घाटगे यांचे त्यांना कायम पाठबळ राहिले. १९९८ साली त्यांना विजय मिळाला. पण त्यानंतर प्रत्येक वेळी या निवडणुका चुरशीच्या झाल्या पण मुश्रीफ अगदी थोड्या मतांच्या फरकाने जिंकत राहिले. विधानसभेत अपयश मिळाले तरी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये संजय बाबा घाटगे यांचा दबदबा कायम होता.

मागच्या निवडणुकी वेळी म्हणजे २०१९ साली कागलची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली. संजय बाबा घाटगे हे शिवसेनेकडून उभे होते तर विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. नेहमी प्रमाणे चुरशीची होणारी निवडणूक विरोधकांची मते विभागली गेल्यामुळे एकतर्फी झाली. संजय बाबा घाटगे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर हसन मुश्रीफ तीस हजार पेक्षाही जास्त मतांनी निवडून आले.

या निवडणुकीचा सर्वात surprising factor हा समरजित घाटगे हे होते. त्यांना तब्बल ८८ हजार मते मिळाली. कायम किंग मेकर ची भूमिका बजवणाऱ्या विक्रमसिंह घाटगे घराण्याचा हा युवराज आता स्वतः कागलचा किंग बनू पाहत होता. त्यांच्या अभ्यासू सुसंस्कृत राजकारणाची छाप कागलकरांना पसंद पडली होती. फडणविसांनी या तरुण नेत्याला हेरलं. त्यांना वेळोवेळी बळ दिलं. समरजित घाटगे भाजपमध्ये गेले. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार हे देखील जवळपास निश्चित होतं.

पण पवारांनी खेळी केली आणि फडणविसांचा हा लाडका उमेदवार अगदी अलगद पणे पळवला.

राजकीय गणिते कोणाच्या बाजूने ?

विरोधक कोणीही असो मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार हा दावा करणारे हसन मुश्रीफ हे कागलच्या राजकारणाचे आजही हिंद केसरी आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेले संजय बाबा घाटगे यांच्या सोबतचे वैर मिटवले आहे. संजय घाटगे यंदा अर्ज न भरता त्यांना पाठिंबा देणार आहेत. राहिला दूसरा गट म्हणजे मंडलिकांचा. तर नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडलिक यांनी काहीही करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचचं हा प्रण केला आहे त्यामुळे ते देखील मुश्रीफ यांच्याच बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे.

कागदावर पाहिलं तर मुश्रीफांचे पारडे जड आहे. पण शरद पवारांना सोडून महायुतीत गेल्याचा तोटा त्यांना काही प्रमाणात बसेल असाच अंदाज राजकीय पंडित वर्तवतात. ही सहानुभूतीची लाट हसन मुश्रीफ कसे थोपवणार? भाजप शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते त्यांचा खुल्या मनाने प्रचार करणार का? संजय बाबा घाटगे , मंडलिक यांचे कार्यकर्ते मुश्रीफांच्या प्रचाराला जीव प्राण एक करतील का ? या सगळ्या गोष्टी निवडणुकीचे deciding factor ठरणार आहेत.

राज्यभरात वचन दिल्याप्रमाणे पवारांनी तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास सुरवात केली आहे. त्यांनी भाकरी पलटली पण गेली ४० वर्षे सुरू असलेला घाटगे घराण्याचा राजकीय वनवास संपवण्यात समरजित घाटगे यशस्वी ठरणार का या प्रश्नाचे उत्तर कागल कर EVM मशीनमधूनच देतील हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.