काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि ऋतुराज पाटील यांनी अत्यंत बारकाईने या कामावर लक्ष ठेऊन हा पुतळा पूर्णत्वाला नेला.
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) नुकतेच अनावरण झाले. पण, तुमच्या मनात हा पुतळा कोणी उभारला आणि किती दिवसांत उभारला, याचा शिल्पकार कोण? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असतील, त्या प्रश्नांचे आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न करु..
मालवणमधील दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या अनावरणासाठी सर्व पक्ष विशेष काळजी घेताना दिसत आहेत. कोल्हापुरात हा पुतळा उभारतानाही अशीच काळजी घेण्यात आली. काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि ऋतुराज पाटील यांनी अत्यंत बारकाईने या कामावर लक्ष ठेऊन हा पुतळा पूर्णत्वाला नेला.
करवीर तालुक्यातील पाचगावमधील मूर्तिकार सतीश घारगे (Satish Gharge) यांनी हा पुतळा साकारला. संकल्पक विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आहेत. भगवा चौक, कसबा बावडा येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समकालीन 16 छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रांचा बारकाईने अभ्यास करून तयार करण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांचा हा पुतळा ब्रांझ धातूचा असून त्याचं वजन अंदाजे दोन टन इतकं आहे. पुतळ्याची उंची साधारणपणे 12 फूट असून चबुतऱ्यासह ही उंची 21 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रांमध्ये डोईवर जिगा, कलगीतुरा या शिरोभूषण मंदिल, कमरेला शेला-पटक्यासह कट्यार व पाठीवर ढाल आहे.
तर, उजव्या हातात पट्टा, डाव्या हातामध्ये धोप (तलवार), पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव आहेत. पुतळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व तत्कालीन चेहरा पट्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीचा चेहरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगडावरील नगारखान्याचा संदर्भ घेऊन भव्य प्रवेशद्वार व त्यावरील सर्व कला तंतोतंत साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
यामध्ये प्रवेशद्वार व त्यावरील कलाकुसर, दगडी कमानीवरील नक्षीकाम, शरब वगैरेचा प्रयत्न जशाच्या तसा करण्यात आला आहे. मुख्य चबुतऱ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांया पायाच्या व हाताच्या प्रतिकृतीचा ठसा पूजनासाठी तयार केला आहे. चबुतऱ्याभोवतीचं नक्षीकाम कोल्हापूरमधील भवानी मंडप, राजवाडा, रंकाळा या सर्वांचा अभ्यास करून उभा करण्यात आले आहे. मुख्य पुतळ्याच्या समोर लहान आयलँडवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राजमुद्राही बसवण्यात आलेली आहे. तर, चौकात कायम स्वरूपी भगवा ध्वज स्तंभ उभा करण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे कसबा बावड्याला सुंदर असं वैभव प्राप्त झाल्याची प्रचिती येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.