इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमदेवारीसाठी चुरस; 'महायुती'कडून कोणाला मिळणार संधी? बंडखोरीचीही शक्यता

Ichalkaranji Assembly Constituency : उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारी काहीजण करीत आहेत.
Ichalkaranji Assembly Constituency
Ichalkaranji Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

हाळवणकर विधान परिषदेवर गेल्यास मग भाजपचे उमेदवार कोण असणार, ही जागा कोणाला सोडणार, याबाबतचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून (Ichalkaranji Assembly Constituency) महायुतीकडून (Mahayuti) इच्छुकांची गर्दी वाढत आहे. सर्वच घटक पक्षांच्या इच्छुकांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामध्ये चौघांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे प्रथमच महायुतीमध्ये उमदेवारीसाठी चुरस दिसत आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारी काहीजण करीत आहेत. त्यामुळे महायुतीसमोर उमेदवारीचा गुंता निर्माण होत असून, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

पूर्वी आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) व माजी आमदार सुरेश हाळवणकर या दोघांभोवतीच चर्चा फिरत होती. पण, आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांची उमेदवारी जाहीर करीत धक्कातंत्राचा वापर केला. आपण कोणाकडे उमेदवारी मागण्यास जाणार नाही. मात्र, महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाने उमेदवारीचा प्रस्ताव दिल्यास प्रतिसाद देणार आहे, असे आमदार आवाडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Ichalkaranji Assembly Constituency
हाळवणकरांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार आवाडे BJP मध्ये करणार प्रवेश? सुपुत्राला मिळणार विधानसभेचं तिकीट?

त्यामुळे महायुतीतून राहुल यांना उमेदवारी मिळणार काय, मिळाल्यास ते भाजपचे की शिवसेनेचे उमेदवार असणार याबाबतही सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ताराराणी पक्षाच्या माध्यमातूनही लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर हेच उमेदवार असणार असल्याचा संदेश या पक्षाच्या प्रभारी आमदार शशिकला जोल्ले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला आहे. भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. पक्षाची मजबूत पकड आहे.

आमदार जोल्ले या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या विभागवार ४० बैठका घेणार आहेत. त्याची पक्षीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे हाळवणकर यांना पक्षाची उमेदवारी मिळणार काय, या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हाळवणकर यांचे नाव विधान परिषदेसाठी अधून-मधून चर्चेत येत आहे. त्यामुळेही आणखी गोंधळात भर पडत आहे.

Ichalkaranji Assembly Constituency
तुम्हाला कानडी येतं का? नसेल तर शिकून घ्या...; शिक्षण खात्याचा अजब निर्णय, शिक्षकांना दिले उद्दिष्ट

हाळवणकर विधान परिषदेवर गेल्यास मग भाजपचे उमेदवार कोण असणार, ही जागा कोणाला सोडणार, याबाबतचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनीही तयारी केली आहे. गणेशोत्सवात विसर्जन मार्गावर त्यांनी लावलेले डिजिटल फलक लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपणह रिंगणात असल्याचे जाहीर करीत जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी धक्का दिला आहे.

Ichalkaranji Assembly Constituency
राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

श्रेय घेण्यासाठी चुरस

सध्या राज्य शासनाकडून विविध योजना, निधी जाहीर केला जात आहे. अशावेळी महायुतीतील पदाधिकारी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करताना दिसत नाहीत. संबंधित घटक पक्ष स्वतंत्रपणे कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे श्रेय घेतानाही कमालीची चुरस दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात महायुती एकसंध नसल्याचेच चित्र आहे.

महायुतीकडील संभाव्य उमेदवार

  • राहुल आवाडे (भाजप अथवा ताराराणी पक्ष)

  • सुरेश हाळवणकर (भाजप)

  • रवींद्र माने (शिवसेना)

  • विठ्ठल चोपडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.