Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाचे वारसदार कोण? 'या' जागांबाबत उत्सुकता, आज मुंबईत बैठक

शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना कोल्हापूरकरांनी नेहमीच साथ दिली आहे. जिल्ह्याने दोन खासदार आणि सहा आमदार देवून हे पुन्हा एकदा दाखवून दिले.
Uddhav thackeray
Uddhav thackeray esakal
Updated on
Summary

अद्याप कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीत कोणाच्या वाटणीला येणार हे निश्‍चित नाही.

कोल्हापूर : लोकसभेसाठी (Loksabha Election) ठाकरे गटाचे वारसदार कोण? हे लवकरच ठरणार आहे. त्याचा अंदाज बांधण्यासाठी मुंबईत (Mumbai) बैठकही होत आहे. मात्र या दोन्ही जागा महाविकास आघाडीत नेमक्या कोणाच्या वाटणीला येणार आहेत, यावर पुढील वारसदार ठरणार आहे.

Uddhav thackeray
NCP Crisis : साहेबांचीच पाॅवर! राज्यातला 'हा' एकमेव मतदारसंघ, जिथं अजितदादांच्या गटाचा एकही पदाधिकारी नाही!

ज्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तर इतर दोन्ही जिल्हाप्रमुखांनी आम्ही केवळ मोर्चे- आंदोलनालाच काय?, असा सवाल उपस्थित करून आम्हालाच उमेदवारी द्या, असा आग्रह धरला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना कोल्हापूरकरांनी नेहमीच साथ दिली आहे. जिल्ह्याने दोन खासदार आणि सहा आमदार देवून हे पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र ‘सच्चा कार्यकर्ता’, ‘स्वाभिमानी कार्यकर्ता’ अशा सर्व शब्दांना तिलांजली देत थेट बंडाचे वारे मूळ शिवसेनेत घुसले आणि उठलेल्या वादळाने आख्खे राज्य हलवून ठेवले.

Uddhav thackeray
NCP Crisis : तब्बल 40 वर्ष ऋणानुबंध; पाटणकरांचा पराभव झाला, तरी पवारांचं प्रेम कमी झालं नाही, हा इतिहास आहे!

त्याची झळ थेट कोल्हापूर जिल्ह्यालाही बसली. ज्या जिल्ह्याने दोन खासदार दिले तेही बंडात सहभागी झाले. आता त्या जागा कोणाकडे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या (Uddhav Thackeray) चिन्हावर दोन्ही खासदार झाल्यामुळे ही जागा ‘उबाटा’ला घ्यावी, आम्हालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह नुकताच संपर्क नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात झाला आहे.

त्यामुळे खासदारकीच्या माध्यमातून ठाकरे गटाचे जिल्ह्यातील वारसदार कोण? हा प्रश्‍न पुढे आला आहे. राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना काम करत रहा, असा सल्ला देवून त्यांना पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारी पक्षप्रमुखांनी त्यावेळी दाखविली होती.

Uddhav thackeray
NCP Crisis : राष्ट्रवादीत उभी फूट; अजितदादांची ताकद भाजपच्या पथ्यावर? थोरल्या पवारांचा 'हा' गड अभेद्य!

मात्र त्यांनी उत्तर विधानसभेसाठी फिल्डींग लावल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख असतानाही त्यांनी मनोगतही व्यक्त केले नाही. देवणे यांनी आठ महिन्यांपूर्वी कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

याचवेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनीही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. उमेदवारी नाहीच मिळाली तर पुढे काय, असाही सवाल मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांत उपस्थित झाला. तेंव्हा राज्यात घडते ते येथे घडेल, असे संकेत देण्यात आले. त्यामुळे लोकसभेसाठी उसना उमेदवार आणला तर ‘उबाटा’ मध्ये जिल्ह्यात बंड शक्य आहे.

Uddhav thackeray
Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; गृहमंत्री म्हणाले, 'CBI कडं तपास देणार नाही'

आज मुंबईत बैठक

अद्याप कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीत कोणाच्या वाटणीला येणार हे निश्‍चित नाही. संपर्क प्रमुख अरुण दुधडवडकर यांनी विधानसभेच्या २८८ जागांची तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसाठी आज (ता. ११) मुंबईत बैठक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.