इचलकरंजी: आज 3 जानेवारी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या (Savitribai Phule Jayanti) जन्मदिवसानिमित्त इचलकरंजीमध्ये संविधान परिवाराच्या वतीने मा. मुख्याध्याकारी यांच्याकडे शहरामध्ये स्त्रियांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. (women toilets in Ichalkaranji)
आज इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी येथे संविधान परिवार वतीने कार्यकर्त्यांनी स्त्रियांच्या स्वच्छतागृह उभारणी संदर्भात मागणी करणारे निवेदन मा. मुख्याध्याकारी यांच्याकडे देण्यात आले. आज इचलकरंजी शहराची लोकसंख्या साधारणपणे चार लाख इतकी आहे. आपल्या शहरात प्रामुख्याने व्यापारी वर्ग व वस्त्रोद्योग क्षेत्रांतील कामगार वर्ग व त्यांचे कुटुंबीय यांची लोकसंख्या अधिक आहे. शिवाय शहराच्या आसपासच्या तारदाळ, खोतवाडी, रुई, चंदूर कबनुर, कोरोची व इतर छोट्या गावातून महिला व मुली शिक्षण व कामासाठी रोजच शहरामध्ये येत असतात.
हे सारे लक्षात घेता, शहरामध्ये विविध भागात, प्रामुख्याने गर्दीच्या, वरदळीच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुसज्ज अवस्थेतील स्वच्छतागृह असण्याची प्रचंड गरज आहे. परंतु स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेचा आणि महत्वाचा हा विषय कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे. तरी आजच्या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त प्रशासनाकडे याबाबत निवेदन देऊन आता युद्ध पातळीवर याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन शहरामध्ये विविध ठिकाणी लवकरात लवकर स्त्रियांसाठी सर्व सोयींयुक्त, सुसज्ज अशी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विभावरी नकाते, स्नेहल माळी, रुचिता पाटील, शिवानी नागराळे, उषा कोष्टी, रिनिशा पाटील, राधिका शर्मा, सुभाग्या कोटगी, वैभवी आढाव, सनोफर नायकवडी तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक चव्हाण, राष्ट्र सेवा दलाचे शरद वास्कर, विवेकवाहिनीचे पवन होदलूर, छात्रभारतीचे रोहित दळवी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.