कोल्हापूर : शाळा सुरु राहिल्यास कारवाई करू

पालकमंत्री सतेज पाटील : क्रीडासंकूलसाठी 50 कोटींचा वाढीव निधीची मागणी
 शाळा
शाळा sakal
Updated on

कोल्हापूर : फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट (Corona Wave)ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या(corona patient) वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवावीत. जी शाळा बंद केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,(will take action if school continues) अशा इशारा पालकमंत्री दिला. तसेच, गायरान जमिनीत क्रीडांगण करण्यासाठी मागणी होत असल्यास त्यांना मंजूरी दिली जात आहे. सध्या आलेल्या प्रस्तावांपैकी कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत. सध्या क्रिडांगणांची मागणी वाढली आहे. 2022-23च्या अनुदानासाठी क्रिडांगण अनुदानात वाढीव मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

 शाळा
लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

श्री पाटील म्हणाले, क्रीडा संकुलासाठी पहिला निधी आला. त्याची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राज्य शासनाने 25 ऐवजी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मार्च मध्ये यईल त्यानंतर पुढील कामे गतीने करता येतील. जिल्हा क्रिडा संकूल दहा एकरात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सिजन प्रकल्प उभारली आहे. सध्या दवाखान्यात ऍडमिट होताना दिसत नाहीत. याचा अर्थ भविष्यात होणार नाहीत, असे नाही. याचीही तयारी केली आहे. पण जिल्ह्यात लसच कवच कुंडल आहे. हे लक्षात घेवून पहिला डोस ज्यांनी घेतलेला नाही. त्यांना लसी दिली जाणार आहे. लस घेण्याची सक्ती केली जाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.(Kolhapur News)

 शाळा
घरफोड्या, चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना नागरीकांचा मदतीचा हात

लस हेच कवच कुंडल

लस घेतलीच पाहिजे. लस हेच कवच कुंडल आहे. जे कोणी लस घेवू नका म्हणतात त्यांचा फारसा विचार करु नका.राज्यात ऑक्‍सिजनवर असणाऱ्या 98 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरणशिवाय पर्याय नसल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून रहिला यामुळे जास्त नूकसान झाले नाही. पण तो दरवाजा का उघडा राहिला याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून चौकशी केली जात आहे. कामात हयगय असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही श्री पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()