Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर; साक्षीदाराने ओळखले रेकी करणाऱ्याचे छायाचित्र
संशयितांच्या वकिलांनी उलटतपास घेतला. त्यामध्ये त्यांनी पंच साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे (Govind Pansare Murder Case) यांच्यावर हल्ला करण्यासाठी रेकी करणाऱ्याचे छायाचित्र पंच साक्षीदाराने न्यायालयात (Court) ओळखले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पंच साक्षीदारांचा सरतपास आणि उलटतपास झाला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विक्रीकर विभागातील दोन्ही अधिकारी पंच साक्षीदार म्हणून आज न्यायालयात हजर होते. त्यांना तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या येथील कार्यालयात पंच साक्षीदार म्हणून बोलविले होते. त्यांच्यासमोर जखमी उमा गोविंद पानसरे (Uma Govind Pansare) यांनी मारेकऱ्यांची छायाचित्रे ओळखली. त्याचा एक पंच साक्षीदार होता.
दुसरेही पंच साक्षीदार हा विक्रीकर विभागातील अधिकारी होते. त्यांनाही शर्मा यांनी बोलविले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी पंच साक्षीदारासमोर एक संशयित दोन दिवस तेथे रेकी करीत होता, असे सांगितले होते. या दोन पंच साक्षीदारांचा सरतपास आज विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी घेतला.
दरम्यान, संशयितांच्या वकिलांनी उलटतपास घेतला. त्यामध्ये त्यांनी पंच साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले. ॲड. समीर पटवर्धन, अनिल रुईकर, ॲड. डी. एम. लटके यांनीही उलटतपास घेतला. पुढील सुनावणी २१-२२ नोव्हेंबरला होणार आहे.
वकिलांमध्ये शाब्दिक वाद
सलग तीन दिवस तीन पंच साक्षीदारांचा सरतपास आणि उलटतपास होणार होता, मात्र काल एक आणि आज दोन्ही पंच साक्षीदारांचा सरतपास आणि उलटतपास पूर्ण झाला. त्यामुळे उद्या होणारी सुनावणी आजच संपली. सुनावणीत ॲड. इचलकरंजीकर यांनी पंच साक्षीदाराला विचारलेल्या एका प्रश्नावर ॲड. निंबाळकर यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. बार कौन्सिलकडे तक्रार करण्यापर्यंत वाद पोहचला. अखेर न्यायाधीश यांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद थांबून पुढे सुनावणी सुरू झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.