Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

एक ते दीडच्या दरम्यान प्रमोद यांना जाग आली असता लाईट लावल्यानंतर त्यांना अस्सल नाग अनिता यांच्या पायाशेजारी फणा काढून बसला असल्याचे दिसले.
Snake
Snakesakal
Updated on
Summary

प्रमोद नागाला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनिता यांचा पाय लागल्याने नागाने दुसरा दंश केला, तरीही नागाला पकडून त्यांनी कुटुंबांसह अनिता यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले.

हातकणंगले : सुमारे दीड हजारहून अधिक सापांना (Snake) जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल मध्यरात्री आळते (ता. हातकणंगले) येथे घडली. अनिता प्रमोद जनगोंडा (वय ३५) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत (Hatkanangale Police) झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आळते येथील अनिता व प्रमोद जनगोंडा यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) केला आहे. प्रमोद एका उद्योग समूहामध्ये नोकरीस आहेत. परिसरात 'सर्पमित्र' म्हणून प्रमोदची ख्याती आहे.

Snake
Satara : उदयनराजेंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते त्यांच्याच विश्वात असतात; शिवेंद्रराजेंनी उडवली खिल्ली

त्याने आजवर दीड हजारांहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याचा सर्पदंशापासून बचाव कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवाय त्याने अनेकांना साप पकडण्याचे ट्रेनिंगही दिले आहे.

Snake
Shiv Sena : अमित शहांनी शब्द दिलाय, त्यामुळं मी शिवसेनेतूनच लोकसभा लढवणार; 'या' खासदारानं स्पष्ट केली भूमिका

काल रात्री बाराच्या सुमारास दोघेही घरात झोपले होते. एक ते दीडच्या दरम्यान प्रमोद यांना जाग आली असता लाईट लावल्यानंतर त्यांना अस्सल नाग अनिता यांच्या पायाशेजारी फणा काढून बसला असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता नागाने अनिता यांच्या एका पायावर दंश केल्याचे दिसून आले.

Snake
Karad : मोराच्या अंगावरची पिसं उपसून काढली अन् व्‍हिडिओ केला शेअर; मध्‍य प्रदेशातील आरोपींना कराडात अटक

प्रमोद नागाला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनिता यांचा पाय लागल्याने नागाने दुसरा दंश केला, तरीही नागाला पकडून त्यांनी कुटुंबांसह अनिता यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या उपचारांपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेने आळते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनिता यांच्या मागे पती, मुलगा, परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.