Kolhapur : अपहृत वारांगनेची पोलिसांमुळे सुटका; थरारक पाठलाग, अपहरणकर्ते पसार

‘वाचवा.. वाचवा’ असा आवाज आला आणि त्या दिशेने पोलिसांनी त्यांची दुचाकी वळवली...
women kidnapping case police save women accused absconds kolhapur crime marathi news
women kidnapping case police save women accused absconds kolhapur crime marathi newsesakal
Updated on

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंगळवारी मध्यरात्री गस्त घालताना एक मोटार सुसाट चालली होती. त्यातून ‘वाचवा.. वाचवा’ असा आवाज आला आणि त्या दिशेने पोलिसांनी त्यांची दुचाकी वळवली.

क्षणात नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पुढे सीपीआर चौक, व्हिनस कॉर्नर, धैर्यशील चौकमार्गे पाठलाग सुरू झाला. अखेर न्याय संकुल परिसरात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पथकाने ती मोटार रोखली.

मोटारीचा वेग कमी होताच महिलेने रस्त्यावर उडी मारली; मात्र मोटार पुन्हा भरधाव वेगाने पुढे निघून गेली. फिल्‍मीस्टाईलने पाठलागामुळे अपहरण झालेली वारांगनेची सुटका झाली; पण गुन्हेगार पळून गेले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात आहे.

पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हेड कॉन्स्टेबल अभिजित चव्हाण गृहरक्षक दलाचे जवान चव्हाण यांच्यासह गस्त घालत होते. त्यावेळी एक पांढरी मोटार चौकात वेगात आली.

women kidnapping case police save women accused absconds kolhapur crime marathi news
Kolhapur Crime : चाचणी परीक्षेचं टेन्शन? शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मोटारीतून महिलेने ‘वाचवा वाचवा’ असा टाहो फोडला. पोलिसांनी मोटार थांबवण्याचा प्रयत्न करत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सक्रिय झाली. व्हिनस कॉर्नरपासून मोटार पुढे जाताना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने पाठलाग सुरू केला.

अखेर कसबाबावड्याकडे जाताना न्याय संकुलासमोर ती मोटार पोलिसांनी रोखली. त्याचवेळी महिलेने मोटारीतून रस्त्यावर उडी मारली; मात्र चालक आणि पाठीमागील सीटवर बसलेली व्यक्ती मोटारीसह पळून गेली.

women kidnapping case police save women accused absconds kolhapur crime marathi news
Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा! मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद

कळंब्यातून अपहरण

संबंधित अपहण झालेली महिला ३० वर्षांची वारांगना आहे. कळंबा परिसरात उभी असता तिच्याजवळ मोटार थांबली. मागील सीटवर बसलेली व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तोंडाला रुमालाने दाबून तिला मोटारीत बसविले. तेथून अपहरण झाल्‍याची फिर्याद त्या महिलेने दिल्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.

मोटार सोलापूरची

पोलिसांनी सांगितले, की क्रमांकावरून मोटार प्रथमदर्शनी सोलापूरची असल्याची माहिती मिळाली आहे. मोटारीतील व्यक्तींपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न गतीने सुरू आहेत. अपहरण का झाले, याचे कारण संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.