कोल्हापूर : आर्युवेदीक गुणवैशिष्ठ्यांनी नटलेला मध हा तंदुरूस्त आरोग्यासाठी बहुगुणी मानला जातो अशा मध निमिर्तीला शासन चालणा देत आहे.त्याचा लाभ घेत राज्यातील जंगली व शेतीभागात मध (Honey)संकलन तेजीत आहे. राज्यातून संकलीत होणाऱ्या मधामध्ये कोल्हापूरातील भुदरगड, आजरा, राधानगरी (Bhudargad,Aajara,Radhanagri) या जंगली तालुक्यातील मधाची गुणवत्ता जागतिकस्तरावरही अव्वल ठरत आहे. ही बाब विचारात घेता अस्सल सेंद्रीय मधाचे संकलन (Collection of organic honey) व व्यवसायाला गती देण्यासाठी खादी ग्रामो उद्योग मंडळ, मध संचानलाय बळ देत आहे.
world bee day 2021 kolhapur special honey bee radhanagri bhudargad aajra news
शुध्द मध जंगलात संकलीत होतो हे खरे असले तरी अगदी अलिकडच्या काळात शेतमळ्यातही मध संकलन होतो. अनेकजन असा संकलीत मध ॲल्युमिनियमच्या पातेल्यात घातलेल्या झाडांच्या फांद्याना पोळे लटकवतात. त्यासोबत दोन चार मधाच्या बाटल्या ठेवतात. २५० ते ५०० रूपये किलो भावात ग्राहक बघून विकतात. ग्रामीण भागातील काही लोकांचा पारंपारीक व्यवसाय आहे. मात्र अशा मध संकलन व विक्रीला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता मात्र, मध संचानलयाने शुध्द व सेंद्रीय मध निर्मितीचे शास्त्रोक्त शिक्षण देणे सुरू केले. त्यातून अस्सल मध संकलन व विक्रीला बळ येऊ लागले.
खादी ग्रामो उद्योग मंडळाने राज्यातील चार हजारावर लोकांना जंगली व नागरी भागातील लोकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडून संकलीत झालेला मध महाबळेश्वरच्या मध संचानालयाच्या केंद्रात आणला जातो. त्याचे पॅकिंग ब्रॅंण्डीग करून तो विकला जातो. हेच काम खासगी कंपन्यांही करतात. त्यामुळे बाजारपेठेत जवळपास सात आठ प्रकारच्या कंपन्यांचे मध बाजारात आहे.
महाबळेश्वर मध संचनालयाचे संचालक दिग्विजय पाटील म्हणाले की, ‘‘ मध संचानालयाचे प्रशिक्षीत लोक जंगलात तीन ते पाच किलो मीटर अंतर आतील भागात मधाच्या पेट्या लावतात, मधमाशा मध संकलीत करून आणून त्या पेटीतील पोळ्यात घालतात. या भागात कुठेही रासायनिक औषध फवारणी झालेली नसते, गाव दूर असते, प्रदुषण नाही तसा दाखला वनविभागाकडूऩ घेतला जातो. अशा भागात संकलीत झालेला मध शुध्द व सेंद्रीय मानला जातो.
जागतिकपटलावर युरोपियन मध सर्वोर्त्तम दर्जाचा मानला जातो. त्याच्या काही पटीने अधिक गुणवत्तापूर्ण कोल्हापूरातील भुदरगड, राधानगरी, आजरा, शाहूवाडी या भागात संकलीत होतो. येथील जंगली मध गुणवत्तेबाबत जागतिक मधालाही मागे टाकतो आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विविध वनौषधीचे झाडे येथील जंगलात आहे. त्याच्या फुलातील मधमाशा शोषून घेतात तोच अस्सल मध आहे. ’’ दहा वर्षावर पूर्वी सर्व मिळून २८०० किलो मध विक्री होत होती. गेल्या तीन वर्षात मध संकलन व विक्री वाढली. सेंद्रीयमध ४००० हजार किलो तर शेती पिकातील मध ६००० किलो विक्री होते.
मधाचे फायदे
मध व्यवसायात तोटा होत नाही.
मध जितका जुना तेवढा तो गुणवत्ता पूर्ण
कोरोना काळात मधाची मागणी २५ टक्क्याने वाढली
भावही वाढता ४०० ते ५०० रूपये किलो भावात मिळतो
मध संकलनाबाबत मोफत प्रशिक्षण मिळते.
दहा व वीस दिवसाचे प्रशिक्षण.
संकलीत मध हमीभावाने खरेदी केला जातो.
वर्षाला ४ हजार किलो मध संकलीत होते.
राज्यातील मध संकलन केंद्रे अशी ः कोल्हापूर (भुदरगड, पाटगाव, राधानगरी, आजरा येथील बारा गावे), नांदेड (किनवट) , लातुर (उदगिर), ठाणे (डहाणू, पालघर ) अमरावती (चिखलदरा), अहमादनगर (भिमाशंकर),
world bee day 2021 kolhapur special honey bee radhanagri bhudargad aajra news
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.