World Hypertension Day: रक्तदाब म्हणजे काय आहे

World Hypertension Day: रक्तदाब म्हणजे काय आहे
Updated on

कोल्हापूर: बदलती जीवनशैली, विश्रांतीचा अभाव, ताणतणाव अशा विविध कारणातून रक्तदाबाची समस्या वाढत आहे. रक्तदाब (Hypertension)नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकांचे औषधोपचार, वैद्यकीय सल्ला मसलतही सुरू आहे. यातच कोरोनाचे (Covid 19) संकट आल्याने ज्यांना रक्तदाब आहे, त्यांची घालमेल वाढली आहे. अशा स्थितीत रक्तदाब काय आहे, तो कधी, कसा वाढतो याबाबत हृदय उपचाराशी संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय (National, International)संस्थांनी शोध निबंध सादर केले आहेत. त्यातील निरीक्षणे सीपीआरचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना (Expert Dr. Akshay Bafna) यांनी संकलित केली आहेत.

World Hypertension Day What is blood pressure information kolhapur marathi news

यातून रक्तदाब व कोरोना विषयीचे निश्चित स्वरूप समजून घेता येणे शक्य होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रक्त दाब त्वरित मोजावा, तो नियंत्रणात ठेवावा आणि दीर्घकाळ जगावे असा संदेश दिला आहे. ज्यांना ॲक्सिजन लागतो. त्यांच्यासाठी हा संदेश महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोरोना औषधांचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

दृष्टिक्षेपात उच्चदाब

देशात २५.३ टक्के लोकांना रक्तदाब

१८ ते २५ वयोगटातील १२. ०१ टक्के लोकांना रक्तदाब

२० ते ३० वयोगटातील ४५.२ टक्के लोकांना पूर्व रक्तदाब (प्रीहायपर टेंशन) आहे.

दहा शाळकरी मुलांत दोघांना रक्तदाब

ग्रामीण भागात प्रमाण जास्त

शंभर मृत्यूमध्ये १० टक्के व्यक्तींना रक्तदाब

हृदयविकाराचा झटका येणाऱ्या २४ टक्के व्यक्तींना रक्तदाब

पक्षाघाताच्या (लकवा) २९ टक्के लोकांना उच्च रक्तदाब

किडणी खराब झालेल्या ५० टक्क्यावर लोकांना उच्च रक्तदाब

गंभीर कोरोना लक्षणांच्या ५८ टक्के व्यक्तीना उच्चरक्त

दाब आहे.

उच्चरक्त दाब बाधितांतील २५ टक्के व्यक्तीना हृदयविकार व पक्षाघाताची लक्षणे

गंभीर कोरोनाबाधितामधील १५ ते २० टक्के व्यक्तींना रक्तदाबाच्या औषधांचा डोस वाढवावा लागतो.

रक्तदाब व कोरोना उपचार

कोरोना उपचारातील औषधांत स्टिरॉईड वापरली जातात. नियमित उपचारात (जनरल ट्रिटमेंट) मध्ये वापरली जातात. यातील डेक्झामेथासोल किंवा मिथाईल र्प्रेडनीसोलॉन अशा औषधांमुळे रक्तदाब वाढतो. ही स्टिरॉईड शरीरातील पाणी खेचून ठेवतात.

सात दिवसांच्यावर औषधे वापरल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता.

अतिजास्त प्रमाणात स्टिरॉइड वापरातून उच्चरक्त दाब होऊ शकतो.

कोरोना उपचारातील स्टिरॉईड, टोक्सीलीझुमॅपही औषधे रुग्णाला गंभीर अवस्थेतून बाहेर काढण्यास उपयोगी ठरतात. या औषधांमुळे ५.७ टक्के व्यक्तीमध्ये रक्तदाब जास्त प्रमाणात वाढत नव्हता, अशा व्यक्तीना रक्तदाब सुरू झाला, तसेच ज्यांना रक्तदाब होता त्यांचा रक्तदाब आणखी वाढल्याची काही उदाहरणे आहेत.

‘रेमडेसिव्हिर’मुळे रक्तदाब वाढत नाही; पण हृदयाचे ठोके कमी होतात. रक्तदाबावरील काही गोळ्या हृदयाचे ठोके कमी करतात. अशा रुग्णांना रेमडेसिव्हिर जपून वापरावे लागते.

‘हिपॅरिन’ हे इंजेक्शन रक्तपातळ करते. ज्या व्यक्तींचा रक्तदाब व्यवस्थित व नियंत्रित नाही. (वर १८० वर खालचा ११० च्या वर आहे) अशा रुग्णांत इंजेक्शन जपून वापरावे लागते, अन्यथा पक्षाघात किंवा रक्तस्राव होऊ शकतो. रक्तदाब २० एमएम एचजीने वाढला किंवा खालचा रक्तदाब दहा एमएम एचजीने वाढतो तेव्हा हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताची शक्यता २ ते ३ पटीने वाढते.

World Hypertension Day What is blood pressure information kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.