स्वरसुमांजली कार्यक्रमात विशेष 881 वी मैफील; गरजूंना मिळणार मदत

स्वरसुमांजली कार्यक्रमात विशेष 881 वी मैफील; गरजूंना मिळणार मदत
Updated on

कोल्हापूर : संगीत (music)माणसाच्या जगण्याला प्रेरणा देत असते. सूर तालांच्या माध्यमातून माणसाचं जसं मनोरंजन होते. हे सूर गरजु लोकांच्या मदतीलाही धावून येत आहेत. येथील प्रशांत जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्षभरा पासून कोरोना काळात आयोजित केलेल्या ऑनलाईन संगीत मैफिलीतून (Online music)अनेक गरजुंना हजारो रुपयांची मदत पोहचली आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन तसेच्या माध्यमातून त्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त स्वरसुमांजली कार्यक्रमात विशेष 881 वी मैफील रंगणार आहे.

प्रतिज्ञा नाट्य संस्थाच्या माध्यमातून 'ना नफ्यासाठी,ना स्वार्थासाठी,आमची कला गरजवंताच्या आधारासाठी' हे घोषवाक्य घेत नाट्य,गीत मैफिली अनेका वर्षापासून राबवल्या.यातून गरजूंना मदत केली.पण कोरोनाचे संकट आले.मैफिली बंद झाल्या.यावर पर्याय म्हणुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या मैफिली सुरु झाल्या.गीतांच्या लाईव्ह मैफीलीतून विविध गरजुंसाठी मदतीचे आवाहन केले जाते.याला प्रतिसाद देते रसिकांनी शंभर रुपयांपासून पाच हजारां पर्यंत मदत केली आहे.जमलेली रक्कम गरजुनं पर्यत पोहचवली जाते.आर्थिक मदती बरोबर औषधे,धान्य,कपडे,पुस्तके या स्वरुपातही रसिकांकडून मदत दिली जाते.

'शो अॅण्ड चॅरिटी मस्ट गो ऑन' हे ब्रिद समोर ठेवून प्रशांत जोशी आणि त्यांचे सहकारी संगीतासह जनसेवा करत आहेत. जोशी यांनी 2007 साला नंतर व्यवसायिक प्रयोगांना दुर करत हा सामाजिक जबाबदारीचा प्रयोग सुरु केला.आज कोरोनाच्या महामारीच्या काळात हे संगीतमय कार्य सुरु आहे.गेल्या वर्ष भरापासून जवळपास 365 ऑनलाईन संगित मैफिली त्यांच्या पार पडल्या आहेत.यातून लाखोंची मदत जमा करुन गरजुंना ती सुपुर्द केली आहे.त्यांच्या या उपक्रमात गीत कलाकार प्रविण लिंबड,गंगाराम जाधव,सुर्यकांत लोले,शिवलाल पाटील,आनंद पाटील,महेश दळवी,प्रदिप मिस्कीन,चंद्रशेखर फडणीस,दिलीप माळी यांनी विशेष गायन सेवा दिली आहे.तर निवेदक म्हणुन विजय जाधव,निलांबरी जाधव,पंडीत कंदले काम पाहिले आहे.

गाडगीळ, कागले यांना आज स्वरसुमनांजली

जागतिक संगीत दिना निमित्त सोमवारी (ता. २१) पार्श्वगायक व संगीत संयोजक चंद्रशेखर गाडगीळ, तसेच संगीतकार व पार्श्वगायक चंद्रकांत कागले यांना मैफलींद्वारे स्वरसुमनांजली वाहण्यात येणार आहे. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेतर्फे स्नेह संगीत प्रतिज्ञा उपक्रमांतर्गत मराठी, हिंदी चित्रपट गीतांच्या सहा ऑनलाईन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सहा मैफली होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.