Laser Light in Ganesh Utsav: गणेश आगमन मिरवणुकीत लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

Ban On Laser Light in Puneगेल्या वर्षी यामुळे काही जणांच्या डोळ्यांना इजा झाली होती. यासह या लेसर लाईटमुळे डोळ्यांचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
Laser Light in Ganesh Utsav Kolhapur
Laser Light in Ganesh Utsav KolhapurEsakal
Updated on

Young man's eyes bleed due to laser during Ganesha Agaman Miravnuk In Kolhapur:

कोल्हापूर, ता. ७ : गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेसर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाला. तो उचगाव (ता. करवीर) येथील आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेसर किरणांमुळे इजा झाली. संबंधित कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उचगाव येथे गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला. त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला होता. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले.

Laser Light in Ganesh Utsav Kolhapur
Ajit Pawar on Sharad Pawar: शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली

पुण्यात लेसरवर बंदी

पुणे शहर पोलिसांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट वापरण्यास बंदी घातली आहे. कारण गेल्या वर्षी यामुळे काही जणांच्या डोळ्यांना इजा झाली होती. यासह या लेसर लाईटमुळे डोळ्यांचे गंभीर आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

Laser Light in Ganesh Utsav Kolhapur
Congress Plan for VidhanSabha: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार; भाजपच्या बालेकिल्याला बसणार हादरे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.