कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या (kolhapur zp) विविध विभागांकडील ११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. सर्वाधिक ५३ बदल्या या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या आहेत. पाठोपाठ महिला व बाल विकास विभागाकडील बदल्या करण्यात आल्या आहेत. दुर्गम तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले होते, मात्र तालुक्याच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. (transfer order) मात्र नंतर प्रतिनियुक्तीने यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आता जरी बदल्या करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात बदलीचे आदेश देताना मात्र तक्रारी होण्याची शक्यता आहे. (kolhapur news) बदलीत काही कर्मचाऱ्यांची सोय तर काहींची गैरसोय झाली असून त्याबाबतच्या तक्रारी पदाधिकारी व सदस्यांकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेत सोमवारी वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. समुपेदशन बदली प्रक्रियेवेळी अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिक्षण सभापती रसिका पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, संबंधित खातेप्रमुख व बदलीसाठी अर्ज केलेले कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाची कर्मचारी संख्या सर्वाधिक असून बदली झालेल्या सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संख्याही आरोग्य विभागाची आहे. आरोग्य सेवक पुरुष, महिला व आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी अशा ५३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. सेवा ज्येष्ठता डावलून काही बदल्या झाल्या असल्याच्या तक्रारी आहेत. बुधवारी याबाबत अधिकचा तपशील उपलब्ध होणार आहे. त्याखालेाखाल महिला बालकल्याण विभागातील २२ पर्यवेक्षिकांच्या बदल्या केल्या आहेत. चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बांधकाम विभागातील १३, वित्त विभागातील ११, पशुसंवर्धन विभागातील ७, कृषी विभागातील ३ व प्राथमिक शिक्षणमधील १ अशा एकूण ११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज केल्या.
बदली प्रक्रिया दिवसभर
बदली प्रक्रिया दिवसभर सुरू होती. प्रशासकीयपेक्षा मोठ्या प्रमाणात विनंती बदल्या केल्या. एकूण ११ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ८३ कर्मचाऱ्यांच्या विनंती, तर १६ कर्मचाऱ्यांच्या आपसी अशा एकूण १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.