Koyna Dam : 1967 च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? काय आहे कारण?

कोयना प्रकल्पात सिमेंट काँक्रिटचे ग्रेडेशन/मिक्स डिझाईन स्वतंत्र अभ्यास करून ठरवण्यात आले होते.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

१९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत.

चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पात (Koyna Hydroelectric Project) आपल्या कार्यकाळात अधिकारी अभियंता म्हणून कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदासह विविध पदांवर सेवा बजावलेल्या मान्यवर निवृत्त अभियंत्यांच्या उपस्थितीत कोथरूड-पुणे येथे अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे नुकतेच लोकार्पण झाले.

या प्रसंगी कोयना धरण (Koyna Dam) उभारणीपासून महत्त्वाची कामगिरी बजावणारे अभियंता (Engineer) एकत्र आले अन् त्यांनी धरणासंबंधित आणि तत्कालीन लोकजीवनासंबंधी आठवणींना उजाळा दिला. १९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? यापासून अलोरे शाळा उभारणीपर्यंतच्या नोंदी करणारी मालिका आजपासून...

Koyna Dam
Jaigad Fort : जयगड किल्ल्याच्या बुरुजाला कशामुळे तडे? पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर महत्त्वाचा अहवाल समोर

सिमेंट हे एक केमिकल आहे. त्यात पाणी किती मिक्स करायचे याचे प्रमाण ठरलेले आहे. सिमेंट काँक्रिटमधील आकुंचन (तडे जाणे) आणि प्रसरण पावण्याच्या प्रक्रियेमुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून कोयना प्रकल्पात सिमेंट काँक्रिटचे ग्रेडेशन/मिक्स डिझाईन स्वतंत्र अभ्यास करून ठरवण्यात आले होते, अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले श्रीधर ए. भेलके यांनी दिली.

Koyna Dam
Nitin Gadkari : भविष्यात बेळगाव जिल्हा बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब; मंत्री नितीन गडकरींची माहिती

कोयनेच्या आठवणी जागवताना भेलके म्हणाले, १९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत. प्रत्यक्ष काँक्रिटचे काम करताना तापमानवाढ होऊ नये म्हणून बर्फ वापरला गेला होता. त्यासाठी बॅचिंग प्लांटची व्यवस्था करण्यात आली होती. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण होत आलेले असताना अलोरेत तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू करायला हवे, असा विचार पुढे आला होता. पहिल्या दोन टप्प्यातील वीजनिर्मितीचे पाणी समुद्राला मिळत होते. हा परिसर समुद्रसपाटीपासून उंच होता. त्या उंचीचा उपयोग करून विद्युतगृह उभारल्यास अधिकची वीजनिर्मिती शक्य असल्याचे लक्षात आले होते.

Koyna Dam
वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ

अलोरे वसाहत उभारली गेली

काम सुरू झाल्यावर सुरवातीला कोयनेतून नियमित अलोरे भागात खोलवर उतरायचे आणि पुन्हा कोयनेत परत यायचे, असा जाण्या-येण्याचा दिनक्रम सुरू होता. यात प्रवासात बराच वेळ जात होता म्हणून अलोरे वसाहत उभारली गेली. त्यामुळे कामाला अधिक वेळ देता आला. अलोरे वसाहत उभारणीची मूळकथा अशी असल्याचे त्यांनी नमूद केले. अलोरे शाळेने हा उपक्रम इथे केला त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्रित येता आलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. याबद्दल भेलके यांनी शाळेचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.