Almatti Dam : कोल्हापूर-सांगली पुराबाबत महत्त्वाची अपडेट! कृती समितीकडून आलमट्टी-हिप्‍परगी दौऱ्याचा अहवाल सादर

या अहवालात नुकत्याच झालेल्या आलमट्टी हिप्परगी (Almatti Dam) येथील दौऱ्यातील निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
Almatti Hippargi Dam
Almatti Hippargi Damesakal
Updated on
Summary

सध्या राधानगरी ते कोयना हा संपूर्ण पट्ट्यात एक सारखा पाऊस पडत आहे. हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे कर्नाटक शासन ऑगस्टअखेर वरच ठेवते.

सांगली : कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने (Krishna Flood Control Action Committee) आलमट्टी हिप्परगी अभ्यास दौऱ्याचा अहवाल जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना सादर झाला. या अहवालात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जलसंपदाचे अधिकारी, तसेच जलतज्ज्ञांची संयुक्त पूर संनियंत्रण समिती स्थापन करावी, अशी प्रमुख मागणी केली. समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सदस्य विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रमोद माने आदी यावेळी उपस्थित होते.

या अहवालात नुकत्याच झालेल्या आलमट्टी हिप्परगी (Almatti Dam) येथील दौऱ्यातील निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. यात दोन्हीकडील अधिकारी पावसाळ्यात धरण साठ्याबाबतच्या केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचे पालन करीत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिप्परगी बंधाऱ्याच्या व्यवस्थापनाशी सांगली विभागातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा संपर्क असत नाही असे दिसून आले. हे तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Almatti Hippargi Dam
Monsoon Red Alert : किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा; आजपासून मुसळधार पावसाची शक्यता!

या बंधाऱ्याचे मुख्य अभियंता श्री. राठोड बेळगाव येथील कार्यालयात असतात. त्यांच्या आदेशानेच या बंधाऱ्यातील पाणीपातळी निश्‍चित केली जाते. सांगलीतील जलसंपदा विभागाने त्यांच्याशी समन्वय ठेवला पाहिजे. पावसाळ्यात दोन्ही राज्यांतील धरणांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची गरज तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी सांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मीक परिचलन व्हावे.

Almatti Hippargi Dam
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताच सरकारनं घेतली महत्त्वाची भूमिका; CM शिंदे म्हणाले, 'हा प्रकल्प जनतेवर थोपविणार...'

सध्या राधानगरी ते कोयना हा संपूर्ण पट्ट्यात एक सारखा पाऊस पडत आहे. हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे कर्नाटक शासन ऑगस्टअखेर वरच ठेवते. वस्तुतः या बंधाऱ्याला कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्व नियम लागू आहेत. त्यासाठी कर्नाटक सरकारला स्पष्ट सूचना देऊन अतिवृष्टीच्या काळात बंधाऱ्याचे दरवाजे शंभर टक्के उघडले पाहिजेत. समितीने या अहवालात कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे हटवणे तसेच नाशिक जलविज्ञान (हायड्रॉलॉजी) विभागाच्या मंजुरीविना झालेल्या नव्या पुलांकडे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्दे

केंद्रीय जलआयोगाच्या जानेवारी २०१८ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच दोन राज्यांच्या समन्वय समितीच्या धोरणानुसार आलमट्टी धरणातील पातळी प्रामुख्याने ३१ जुलैला पन्नास टक्के, ३१ ऑगस्टला ७७ साठा ठेवावी. त्यावेळी पाणीपातळी ५१७ मीटर ठेवली पाहिजे. दैनंदिन पाणीपातळी व आवक जावक विसर्ग प्रत्येक तासाला कळवावी. हिप्परगी बॅरेज येथे दोन्ही राज्यांचे अभियंते दैनंदिन पाणीपातळी विसर्गबद्दल माहिती सांगतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()