पश्चिम महाराष्ट्र
Killemachindragad News : सांगली पर्यंत कृष्णेचे पाणी दुषित करणारा ओढा...| ओढ्याद्वारे दुषित पाणी सोडणाऱ्या दोषीवर कारवाई का होत नाही?
वाळवा तालुक्यातील पूर्वेत्तरेकडील भवानीनगर, नरसिंहपूर, रेठरे हरणाक्ष, किल्लेमच्छिंद्रगड या गावासाठी 'हर घर जल' योजनेअंतर्गत ग्रामपंचायत लोकसभा निवडणुकीपुर्वी पाणी पुरवठा योजनांची मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटने झाली.
किल्लेमच्छिंद्रगड - वाळवा तालुक्यातील पूर्वेत्तरेकडील भवानीनगर, नरसिंहपूर, रेठरे हरणाक्ष, किल्लेमच्छिंद्रगड या गावासाठी हर घर जल योजनेअंतर्गत ग्रामपंचायत लोकसभा निवडणुकीपुर्वी पाणी पुरवठा योजनांची मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटने झाली.
तथापी कऱ्हाड तालुक्यातील खुबी गावच्या वेशीजवळ येवून मिळणाऱ्या परिसरातील उद्योग व्यवसायाचे केमिकल मिश्रीत तसेच जुळेवाडी पासून कोळे (ता. वाळवा) गावापर्यंतचे सांडपाणी या ओढ्यास मिळत असलेने पुर्वेत्तरेकडील गावासाठी केलेल्या पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरीकांना खरेच पिण्याचे स्वच्छ पाणी पिण्यास मिळणार की योजना अस्तित्वात आल्यानंतर पाणी पिण्यास योग्य नाही. या कारणास्तव यापूर्वीच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेप्रमाणे नव्याने अस्तित्वात येणाऱ्या योजनाही पडून राहणार याचा विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येते.