सोलापूर ः कष्टाला जिद्दीची जोड दिली तर कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नाही, याचेच ज्वलंत उदाहरण सोलापुरातील सुनंदा सुभाष होटकर यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. घरगुती कामे करतानाच गोळ्या-बिस्किटे विकण्याचे काम करून त्यांनी घरगुती आटाचक्कीचे उत्पादक इथपर्यंत यशस्वी मजल मारली आहे.
कन्येसाठी वाट्टेल ते.... हमाल करतोय मुलीच्या स्वप्नांसाठी सगळा पगार खर्च
स्वयंपाकासाठी वापरले काटेकुटे
मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या सुनंदा लग्नानंतर सोलापुरात राहायला आल्या. लष्कर परिसरातील झोपडपट्टीत त्या राहात होत्या. पती सुभाष एन. जी. मिलमध्ये दरमहा 150 रुपये पगारावर कामाला होते. चुलीवर स्वयंपाक व्हायचा, सरपण कमी पडले की त्यांच्या सासूबाई रस्त्यावर पडलेली काटेकुटे, लाकडे आणायच्या आणि त्यानंतर स्वयंपाक व्हायचा. तोही रेशनमधून आणलेल्या अर्धा किलो तांदळाचा.
हे आवर्जून वाचा... कोसळलेले आयुष्य पेलताना
मुलांची खेळणी विकावी लागली
मुलगी एक महिन्याची असताना 1988 मध्ये घरातच किराणा दुकान सुरू केले. घरगुती शिलाईचे कामेही त्या करू लागल्या. काही दिवसांनी सुभाष यांनी कर्ज काढले आणि जुने घर विकत घेऊन, त्याची डागडुजी करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. काही दिवस त्यामुळे घरखर्च भागला. त्याचदरम्यान मिल बंद पडली, त्यामुळे त्यांच्या हलाखीचे दिवस पुन्हा सुरू झाले. त्यामुळे सुभाष कामानिमित्त पुण्याला गेले आणि सुनंदा यांनीही पारशी विहिरीजवळ भाड्याने घर घेतले. घरची स्थिती इतक्या हलाखीची झाली, की मुलांसाठी घेतलेली खेळणी विकून घरखर्च भागविण्याची वेळ आली.
अशी असावी मैत्री.... शालेय मैत्रिणीला केली अशीही मदत
गुजरातच्या दौऱ्यानंतर मिळाली जीवनाला दिशा
मुलीला मिळालेल्या शिष्यवृत्तीचे पैसे घेऊन त्याही पुण्याला गेल्या. त्या ठिकाणी पतीबरोबर किराणा दुकानांत जाऊन गोळ्या-बिस्कीट विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी उल्हासनगर येथून साहित्य आणले जायचे. या व्यवसायात जम बसल्यावर त्या गुजरातला गेल्या. सुभाष यांच्या गुजरातमधील मित्राने घरगुती आटाचक्की बनविण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. मग सुनंदा यांनीही आटाचक्की बनविण्याचे काम सुरू केले.
आदर्शवत... चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत
घरोघरी जाऊन विकल्या आटाचक्की
बनविलेली आटाचक्की घरोघरी जाऊन विकण्यास सुरवात केली. ग्राहकांकडे पैसे नसले, तरी नंतर द्या असे सांगून त्यांना आटाचक्की देत. अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज त्या आपल्या व्यवसायात यशस्वी झाल्या असून, बालाजी आटाचक्की या नावाने त्यांच्या फर्मने यशस्वी व्यवसायाच्या यादीत स्थान मिळवले आहे. आज त्यांचा एक मुलगा सचिन पोलिस खात्यात आहे, तर दुसरा सागर व्यवसाय करत आहे.
चला एेकुया सुनंदा यांची कहानी (VIDEO)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.