Dudhsagar Railway : दूधसागरजवळील रेल्वे मार्गावर दरड कोसळली; 'इतक्या' तासांनंतर वाहतूक पूर्ववत सुरू

दरड कोसळल्यामुळे यशवंत एक्स्प्रेस (क्र. १७३१०) मध्यरात्री १ वाजता सोनालियम येथून कुळे स्टेशनला परतली.
Dudhsagar Railway
Dudhsagar Railwayesakal
Updated on
Summary

कॅसरलॉकपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तीन क्रमांकाच्या बोगद्याजवळ ही दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या.

बेळगाव : लोंढा-गोवा दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावरील (Londha-Goa Railway Line) दूधसागर आणि सोनालियममध्ये शुक्रवारी (ता. २५) मध्यरात्री १२.५५ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड आणि झाडे कोसळली. नैऋत्य रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने दरड हटवण्याचे काम हाती घेतले. पहाटे ५.३५ वाजता ट्रॅक फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले व वाहतूक पूर्ववत झाली.

घटना घडल्यानंतर कॅसल रॉकमधून मदत सामग्री मागविण्यात आली. बचाव पथकासह पुरेसे कर्मचारी होते. दरम्यान, दरड कोसळल्यामुळे यशवंत एक्स्प्रेस (क्र. १७३१०) मध्यरात्री १ वाजता सोनालियम येथून कुळे स्टेशनला परतली. तसेच इतर गाड्यांवरदेखील परिणाम झाला. सर्व प्रवाशांसाठी पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

या दरम्यान गरज भासल्यास बसेसच्या व्यवस्थेसाठी रेल्वेने परिवहनशी संपर्क साधला होता. नैऋत्य रेल्वेचे जीएम अरविंद श्रीवास्तव, के. एस. जैन व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. हुब्बळीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हर्ष खरे यांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. अवघ्या चारच तासांमध्ये दूधसागर आणि सोनालियम विभागादरम्यानची दरड साफ करण्यात आली आणि लोंढा-तीनई घाटदरम्यान पडलेले झाड हटवण्यात आले.

Dudhsagar Railway
पन्हाळगडच्या तटबंदीतील 10 ते 12 फूट उंचीची दगडी शिळा कोसळली; नागरिकांत भीतीचं वातावरण, नेमकं काय घडलं?

सकाळी ५.३६ वाजता ट्रॅक फिट असल्याचे प्रमाणित करण्यात आले आणि सामान्य ट्रेनच्या हालचालीसाठी पूर्ववत करण्यात आले आहे. वास्को-तिरुपती एक्स्प्रेस (क्र. १७४१९) लोंढा येथून सकाळी ६ वाजता सुटली आणि वास्को-यशवंतपूर रेल्वे (क्र. १७३०९) अळणावर येथून सकाळी ६.०५ वाजता निघाली. मागील वर्षी जुलै महिन्यातच शेवटच्या आठवड्यात बेळगाव-गोवा दरम्यानच्या ब्राँगांझा घाटातील दूधसागरजवळील करंझोळजवळ दरड कोसळली होती.

कॅसरलॉकपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तीन क्रमांकाच्या बोगद्याजवळ ही दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. प्रवाशांना याचा फटका बसला होता. सुमारे आठ दिवस हा मार्ग बंद होता. हुबळी-गोवा हा घाटमार्ग असल्याने या मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यापूर्वी या मार्गावर दरड कोसळल्या आहेत. यानंतर पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी नैर्ऋत्य रेल्वेकडून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.