ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत व ज्या पात्र ठरल्या आहेत, अशा महिलांच्या खात्यावर १३ तारखेपासून जुलै-ऑगस्ट महिन्यांचे ३००० हजार रुपये जमा होण्यास सुरवात झाली आहे.
कोकरूड : राज्य सरकारने (Maharashtra Government) जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून रक्षाबंधनापूर्वी (Raksha Bandhan) पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र ज्या महिलांच्या बँक खात्यास (Bank Account) आधार लिंक नसल्याने ही योजना ‘केवायसी’च्या (KYC) फेऱ्यात अडकली आहे, अशा महिलांनी आधार लिंक करण्यासाठी बँकेबाहेर तोबा गर्दी केली आहे.