पाण्याच्या मोठया साठ्याने वाघोलीत तलावाचा बांध खचला

A large reservoir of water eroded the dam of Wagholi Lake
A large reservoir of water eroded the dam of Wagholi Lake
Updated on

 घाटनांद्रे : वरुणराजाच्या कृपादृष्टीने वाघोली (ता. कवठेमहंकाळ) येथील पांढरखोरा परिसरातील गाव तलाव भरल्याने पाणी सांडव्यातून जाण्याऐवजी तलावाच्या बांधावरून वाहू लागले आहे. पाण्याच्या मोठया साठ्याने तलावाचा बांधच खचला आहे. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. 

याबाबतची माहिती अशी, की वाघोलीच्या पश्‍चिमेला पांढरखोरा परीसरात शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून सन 1983 मध्ये पाझर तलाव बांधला. नंतर तलाव कधीही पुर्ण क्षमतेने भरला नाही. परंतु यंदा पावसाची कृपादृष्टी झाली. तलाव काठोकाठ भरला आहे. अद्यापही तलावात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या तलाव भरून पाणी सांडव्यातून जाण्याऐवजी तलावाच्या बांधावरुन वाहू लागले आहे. पाण्याच्या मोठा साठा झाल्याने तलावाचा बांध खचला आहे. धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामतः तलावाखालील शेतजमीन, द्राक्षबागा व वस्त्यांना धोका निर्माण झाली आहे. 

ग्रामपंचायत व संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (छोटे पाटबंधारे विभाग) यांना लेखी कळवूनही दुर्लक्ष होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ तलावाची दुरूस्ती करावी, अन्यथा उद्‌भवणाऱ्या परिस्थितीस जिल्हा परिषदेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

तलावाच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाला लेखी कळवूनही दुर्लक्ष केले जात आहे. धोकादायक स्थिती उद्‌भल्यास संपूर्ण जबाबदारी त्या विभागाची राहिल. 
- सौ. अनिता दिपक शिंदे, उपसरपंच 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()