शेवगाव : शहरातील स्मशानभूमीत वीज, पाणी व स्वच्छता या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्ते संजय नांगरे यांनी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून गांधीगिरी केली.
शहरातील आंबेडकर चौकातून पैठण रस्त्यावरील स्मशानभूमीपर्यंत काढलेल्या या अंत्ययात्रेमुळे नगरपरिषद प्रशासन शहरातील नागरिकांच्या टीकेचा व चर्चेचा विषय झाला. शहरातील पैठण रस्त्यावरील स्मशानभूमीत कमालीची अस्वच्छता असून, पाण्याची व रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची सोय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांचे हाल होतात. या संदर्भात नांगरे यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजीही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते.मात्र, तरीही नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे आज नांगरे यांनी स्वतःची अंत्ययात्रा काढून पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरातील आंबेडकर चौकातून नांगरे यांची अंत्ययात्रा पैठण रस्त्यावरील अमरधाममध्ये नेण्यात आली. यात भाकपचे कार्यकर्ते, सम्राट अशोकनगर ग्रुप, भीमराजे हेल्थ क्लब, लहूजी ग्रुप, नाईकवाडी मोहल्ला व इदगाह मैदान यंग ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अंत्ययात्रा स्मशानभूमीत गेल्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने नांगरे, समद काझी व क्रांती मगर यांनी तेथे उपोषण सुरू केले आहे.
आयुक्त कार्यालयासमोर उपोषण
शेवगाव शहरातील स्मशानभूमी, घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊनही कुठलीच चौकशी होत नाही. त्यामुळे नगरसेवकांसह नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर 7 जानेवारी उपोषण करणार आहोत.
- कमलेश गांधी, नगरसेवक, शेवगाव
हे महत्त्वाचे अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पुन्हा पत्र
सर्व सुविधा उपलब्ध करणार
शहरातील खुंटेफळ रस्त्यावरील तीनही स्मशानभूमीच्या सुशोभिकरण करण्यासाठी 23 लाख 22 हजार 61 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. स्माशनभूमीत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचे उपोषणकर्त्यांना समजावून सांगितले आहे.
- वजीर शेख, उपनगराध्यक्ष, शेवगाव
हे वाचलेच पाहिजे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 700 हून अधिक खेळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.