किल्लेमच्छिंद्रगड: सन १९८० पूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकासाठी मतदारांना सभेला हजर राहण्यासाठी कोणतेही आमिष नसायचे. नेत्याचे चारित्र्य आणि मतदाराचे सत्वच निवडणुकीचा निकाल निश्चित करायचे. काळ, बलदला, वाढत्या लोकसंख्येमुळे गावोगावी गल्लीबोळात कार्यकर्ते निर्माण झाले.
गल्लीतले दादा आणि भावकितले बडे प्रस्थ मतदान कुणाला करायचे हे ठरवू लागले. अर्थात त्यासाठी काळाच्या ओघात बदललेले नेते हात ओले करू लागले हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
त्यामुळे अलिकडच्या निवडणुका खर्चिक झाल्या आहेत. हाल ओला तर मैतर भला हे राजकारणात नवीन पायंडा पडू लागला आहे. त्याला ग्रामपंचायत असो वा लोकसभा अपवाद राहिलेला नाही. विकासाच्या आणि तत्वाच्या नावाखाली दलबदलूपणा वाढीस लागला आहे.
जून अखेर लोकसभेच्या निवडणुकीची पूर्तता होऊन १८ वी लोकसभा अस्तित्वात येईल. या निवडणुकीची जाहिरातबाजी पाहता भंपकबाजी वाटते. लोकांना भिक नको हक्काच्या कष्टाची भाकर हवी आहे. त्यासाठी त्यांना स्वतःचा असा हक्काचा रोजगार हवा आहे.
ते देण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे सरकारचे भविष्य धोक्यात आलेले दिसतेय. कारण लाखो गॅस लाभ धारकांनी गॅसचे आदुदान नाकारले. हा आणि अबोलपणे देशावर प्रेम करणारा बुद्धिजीवी नागरिकच १८ व्या लोकसभेचे भवितव्य निश्चित करणार आहे. हे मात्र नक्की..!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.