निवडणुकीला ३८ ते ४० दिवस राहिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.
बहे : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. युती-आघाडीच्या कोणी कितीही वावड्या उठवू देत, असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. हातकणंगले लोकसभा निवडणूक (Hatkanangale Loksabha Election) स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर करत सुरू असलेल्या चर्चांना शेट्टी यांनी पूर्णविराम दिला.
बहे-तांबवे रस्त्यावरील धारा रिसॉर्ट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबिर’ झाले. यामध्ये श्री. शेट्टी (Raju Shetti) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. संजय थोरात, महेश खराडे, पोपटराव मोरे, संदीप राजोबा, ॲड. एस. यु. संदे, संजय बेले, भागवत जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार आहोत. निवडणूक सोपी नाही. ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शिकवलेल्या गनिमीकाव्याने लढावी लागणार आहे. निवडणुकीला ३८ ते ४० दिवस राहिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. ऊस आंदोलनामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना ६५० कोटींचा फायदा झालेला आहे. चळवळीतील काम घरोघरी पोहोचवा,’ असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.