Loksabha Election : सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडं जाणार? काँग्रेस आमदार म्हणाले, यापूर्वी तीन वेळा कदम कुटुंबाला..

सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला व काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
Sangli Congress Politics
Sangli Congress Politicsesakal
Updated on
Summary

कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस हा मतदारसंघ इतर कोणत्याही पक्षाला देण्याचा प्रश्नच येत नाही.

कडेगाव : सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच (Congress) राहील; तर विशाल पाटील हेच सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व खासदारही असतील हे निश्चित आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी सोनहिरा कारखाना (Sonhira Factory) कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Loksabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाला जाणार, अशा चर्चा होत असल्या तरी त्यामध्ये कसलेही तथ्य नाही. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला व काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस हा मतदारसंघ इतर कोणत्याही पक्षाला देण्याचा प्रश्नच येत नाही.

Sangli Congress Politics
Loksabha Election : सांगलीच्या काँग्रेसवर ही वेळ का आलीये? जयंतरावांनी नेहमीच काँग्रेस खिळखिळी करण्याचा केला प्रयत्न!

विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस एकवटली आहे. कदम कुटुंब हे चौथ्यांदा दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे; तर यापूर्वी तीन वेळा पक्षश्रेष्ठी कदम कुटुंबाला सांगली लोकसभेची उमेदवारी देत असतानाही डॉ. पतंगराव कदमसाहेब व माजी आमदार मोहनराव कदम यांनी ती नाकारत वसंतदादांच्या कुटुंबातील सदस्यांना संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. आताही आम्ही विशाल पाटील यांना सांगलीतून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे ठाण मांडले आहे. त्यामुळे सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच राहील, तर आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हेच सांगलीचे खासदार असतील, असे ते म्हणाले.

Sangli Congress Politics
काँग्रेसला उमेदवारी डावलल्यास 2009 प्रमाणं 'जत पॅटर्न' राबवू; बड्या नेत्याचा स्पष्ट इशारा, नेमका काय आहे जत पॅटर्न?

रोहित पवार यांना टार्गेट केले जातेय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीने विकत घेतलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ‘ईडी’ने जप्त केला. तसेच, १६१ एकर जमिनीसह यंत्रसामग्रीवरही टाच आणली. या प्रश्नांवर बोलताना डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, रोहित पवार हे तरुण नेतृत्व आहे. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळेच आज त्यांना प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून टार्गेट केले जातेय. परंतु, सत्य काय ते न्यायप्रक्रियेतून निश्चितपणे उघडकीस येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()