Sangli : राजकारण तापलं! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'हे' दोन बडे नेते एकत्र; भेटीत कोणती झाली चर्चा?

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आल्यामुळे संभाव्य उमेदवारांची चर्चा  सुरू झाली आहे.
Sanjay Patil and Vishal Patil
Sanjay Patil and Vishal Patilesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीची बूथ समित्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली लोकसभा व विधानसभेच्या जागांवर दावा केला आहे.

सांगली : खासदार संजय पाटील (Sanjay Patil) आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकतीच काही काळ एकत्रित  बैठक  झाली. त्याची जिल्हा बँकेत जोरदार चर्चा सुरू होती.

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आल्यामुळे संभाव्य उमेदवारांची चर्चा  सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस पक्षामधून विशाल पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आले आहे. 

Sanjay Patil and Vishal Patil
Jaysingpur : राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर..; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

मुंबईमध्ये काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीतही विशाल पाटील यांना निवडणुकीसाठी तयारीला लागा , असे सांगितले आहे. त्याच वेळी भाजपकडून खासदार पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भात खासदार पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘मी जत्रेतला पैलवान नाही; कुस्तीच्या फडातला पैलवान आहे,’ असे वक्तव्य केले होते.

Sanjay Patil and Vishal Patil
Mumbai : दीड वर्षाची चिमुरडी आईच्या कुशीत निजलेली, तितक्यात अपहरणकर्त्यानं..; रेल्वेतील थरारक घटना समोर

राष्ट्रवादीची बूथ समित्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली लोकसभा व विधानसभेच्या जागांवर दावा केला आहे. आज दोन्ही नेते जिल्हा बँकेत काही काळ एकत्रित आले होते. त्यांच्यात झालेल्या बैठकीची चर्चा सुरू होती. याबाबत दोघांना विचारले असता कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दिवसभर या दोघांचीच चर्चा बँकेच्‍या आवारात सुरू होती.

Sanjay Patil and Vishal Patil
Karnataka चे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होणार 'बस कंडक्टर'; काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.