मला तुमच्या मदतीची गरज आहे; तुम्ही लवकर टीम घेऊन या 

मला तुमच्या मदतीची गरज आहे; तुम्ही लवकर टीम घेऊन या 

Published on

भिलार (जि. सातारा) : सोमवारी दुपारी दीड वाजता महाबळेश्वर ट्रेकर्सचे संस्थापक सदस्य सुनील बाबा भाटीया यांना किल्ले प्रतापगडवरून एका व्यक्तीचा फाेन आला मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही लवकर टीम घेऊन्‌ प्रतापगड किल्ल्यावर या. भाटिया यांनी संबंधितातकडून माहिती घेतली आणि आम्ही येताेच असे कळविले.
 
पर्यटनासाठी काही युवक प्रतापगड किल्ल्यावर गेले हाेते. तेथे फिरल्यानंतर एका कड्यावर ते उभे हाेते. तेथून खाली पाहताना त्यांच्याकडून कॅमेरा खाली पडला. त्यामुळे ते भयभीत झाले. त्यांनी नेहमी समाजसेवेत सक्रिय असणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला मदतीचा हात मागितला. या समूहातील भाटिया यांनी लागलीच एस. ओ. एस. या व्हाट्‌सअप ग्रुपवर सर्वांना संदेश टाकला. त्यानंतर सर्वजण एकत्र जमा झाले. त्यांनी आवश्यक ते साहित्य घेऊन प्रतापगडच्या दिशेने रवाना झाले. प्रतापगड इथे सर्व टीम पोहोचल्यानंतर पर्यटकांनी सर्व घटना सविस्तर सांगितली. त्यातील एकजण म्हणाले माझ्या मुलाचा ' गोप्रो कॅमेरा ' गडावरील कडेलोट पॉईंटच्या दरीत पडल्याचे सांगीतले. तो कॅमेरा भारतीय डिफेन्स फोर्सेसच्या अधिकाऱ्याचा आहे. आणि त्यामध्ये संवेदनशील माहिती आणि प्रशिक्षणाचे व्हिडिओ आहेत. तो डिफेन्सफोर्समध्ये अधिकारी आहे. ट्रेकर्सना त्यांच्या अंदाजानसार कॅमेरा जवळ जवळ 300 ते 400 फूट खोल दरींमध्ये पडल्याचे लक्षात आले.

क्षणाचाही विलंब न करता महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान दरीत उतरू लागले. पहिल्या टप्प्यात अनिल लागीं व मंगेश साळेकर कॅमेरा शोधत होते. गवत जास्त वाढल्यामुळे कॅमेरा शोधण्यास अडथळा निर्माण होत होता व दुसऱ्या टप्प्यात अमित कोळी उतरू लागला. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कॅमेरा शोधण्यात यश आले. 

या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगने, सुनील बाबा भाटिया, सनी बावळेकर, निलेश बावळेकर, अनिल लांगि, अक्षय जाधव, अनिकेत वागदरे, तेजस जवळ, अक्षय माने, मंगेश सालेकर, सौरव सालेकर, अमित कोळी, शेखर कदम, रवी झाडे, सचिन डोईफोडे, सौरभ उतेकर यांचा सहभाग होता. हे रेस्क्‍यू करत असताना जवानांनी एक समाजिक्‌ बांधीलकि जपली त्या दारींमध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व प्लास्टिकचे कागदसुद्धा दरीतून गोळा करून स्वच्छता अभियान राबवले.

वाचा : आपण शासकीय कर्मचारी आहात मालक नव्हे; भाजप नगराध्यक्षांचे 'त्यांना' प्रत्युत्तर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.