सांगली जिल्ह्यात भाजपला २०१४ च्या लाटेत जे यश मिळाले होते, त्यापेक्षाही सरस कामगिरी यंदा २०२४ मध्ये दिसली. भाजपने जिल्ह्यातील सांगली, मिरज हा गड तर हिंदुत्व, ‘लाडकी बहीण’ आणि विकासकामांच्या जोरावर राखलाच; याशिवाय ‘शिराळा’ आणि ‘जत’ हे २०१९ ला गेलेले गडही पुन्हा जिंकून आणले. शिवसेना शिंदे गटाची एक जागा होती. ती कायम राखण्यासाठी भाजपने केलेली खेळी शिवसेनेला उपयोगी ठरली. त्यामुळे विधानसभेत सुहास बाबर हा नवा चेहरा ‘खानापूर’ने पाठवला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वैभव पाटील यांना येथे मात दिली आहे.