Koganoli : सीमा तपासणी नाक्यावर घोळ सुरूच

अटींमुळे प्रवाशांची संख्या घटली; कोगनोळीत बंदोबस्त कायम
Koganoli : सीमा तपासणी नाक्यावर घोळ सुरूच
Koganoli : सीमा तपासणी नाक्यावर घोळ सुरूचsakal media
Updated on

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरील येथील सीमा तपासणी नाक्यावरून आरटी-पीसीआर अहवाल किंवा कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना कर्नाटकात प्रवेश देणार असल्याचे जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी सोमवारी (ता. २९) घोषित केले आहे. तत्पूर्वी प्रवेशासाठी आरटी-पीसीआरची सक्ती प्रशासनाने केली होती. मात्र कोरोना प्रतिबंधक दोन डोस की आरटी-पीसीआर अहवाल यावरून मंगळवारी (ता. ३०) देखील येथील सीमा तपासणी नाक्यावर गोंधळ व घोळ सुरूच होता. कर्नाटकात प्रवेशासाठी आरटी-पीसीआरच्या सक्तीच्या जाचक अटीमुळे प्रवाशांची संख्या घटली असून पोलिस बंदोबस्त कायम आहे.

Koganoli : सीमा तपासणी नाक्यावर घोळ सुरूच
''गोवा भाजपच्या मंत्र्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार'', काँग्रेसचे गंभीर आरोप

सीमा तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर अहवाल की कोरोनाचे दोन डोस यावरून प्रवाशांचीही तारांबळ उडत आहे. नियमांवलीमुळे येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी दोन दिवसांपासून कमी झाली आहे. कर्नाटक शासनाच्या जाचक अटींमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणारी मंडळी आपल्या गावीच थांबत आहेत. अंत्यत आवश्यकता असली तरच वाहनधारक येत असल्याने प्रवाशांची गर्दी रोडावली आहे. गेल्या दोन दिवसात महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे आरटी-पीसीआर अहवाल पाहूनच प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांकडे अहवाल नाही, अशा प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून दिले जात आहे.

निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, एस. एम. सूर्यवंशी, एस. के. नरेगल, राजू गोरखनावर यांनी बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी महसूल विभागाचे तात्यासाहेब पाटील व आरोग्य विभाग कर्मचारी तैनात केले आहेत.

Koganoli : सीमा तपासणी नाक्यावर घोळ सुरूच
स्वतंत्र विदर्भ होणार का? केंद्र सरकारने लोकसभेत दिलं उत्तर, म्हणाले...

सीमाभागातील नागरिक, कामगारांना दिलासा

कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या महाराष्ट्रातील वंदूर, करनूर, शंकरवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूरसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांचे ओळखपत्र पाहून सोडले जात आहे. तसेच महाराष्ट्रात असणाऱ्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहतीसह कोल्हापूर व इतर ठिकाणी रोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अोळखपत्र पाहून सोडले जात असल्याने सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()