नगर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला आहे. रोहित पवार यांना 135824 तर भाजपचे राम शिंदे यांना 92477 मते मिळाली. राेहित पावर यांचा 43347 मतांनी रोहित पवार यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे.
गेल्या काही महिन्यांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्या टप्प्यात मतदारसंघात आघाडी घेतली होती. रोहित यांनी पहिल्या पाच फेऱ्यांत 13 हजार मतांची आघाडी घेतली. सुरुवातीपासूनच कर्जत-जामखेडमध्ये रोहित यांचा विजय निश्चित मानला जात होता.
त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले होते. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्यासाठी ही निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक ठरली. मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समर्थकांची गर्दी असून, फेरी निहाय निकाल जाहीर होताना, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. पिछाडीवर पडल्याने राम शिंदे यांच्या समर्थकांच्या चिंता वाढल्या आहेत. तर, रोहित पवार समर्थकांचा उत्साह फेरीनिहाय वाढत जाताना दिसत आहे.
सर्वांत लक्षवेधी निवडणूक
सुरुवातीला पवार यांच्यासमोर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मुंजषा गुंड यांच्या बंडखोरीचे आव्हान उभे केले होते. तथापि, त्यांनी अखेरीस पवार यांच्या पाठिशी ताकद उभी केली. पवार व शिंदे यांच्यातील ही लढत राज्याचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली. रोहीत यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे आदींनी या मतदारसंघात सभा घेतल्या.
राम शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सभा घेतली. त्यामुळे या मतदारसंरघात हायटेक प्रचार झाला. त्यामुळे दोघांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली हाेती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.