कर्जमाफीत तब्बल 36 हजार शेतकऱ्यांवर अन्याय; तीन वर्षांतून एकदा कर्ज घेत परतफेड केलेले अनुदानापासून वंचित

तीन वर्षांत फक्त एकदाच पीककर्ज उचल केलेल्या ३६ हजार शेतकऱ्यांवर (Farmers) अन्याय होत आहे.
Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana
Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojanaesakal
Updated on
Summary

आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७७ हजार ३५९ शेतकऱ्यांना ६४४ कोटी ६९ लाख रुपये लाभ मिळाला.

कुडित्रे : राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana) २०१९ अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित होते. लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जाहीर जारी केले. मात्र, यामध्ये एका वर्षात दोनवेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश आहेत.

तीन वर्षांत फक्त एकदाच पीककर्ज उचल केलेल्या ३६ हजार शेतकऱ्यांवर (Farmers) अन्याय होत आहे. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभासाठी २०१७/१८, २०१८/१९, २०१९/२० हा कालावधी विचारात घेतला. कर्जाच्या मुद्दलेवर जास्तीत जास्त पन्नास हजार, ५० हजारांपेक्षा कमी असल्यास २०१८/१९ व २०१९/२० या वर्षातील कर्ज मुद्दलाच्या रकमेत हा लाभ दिला. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७७ हजार ३५९ शेतकऱ्यांना ६४४ कोटी ६९ लाख रुपये लाभ मिळाला.

Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana
Konkan Coast : अख्खी कोकण किनारपट्टी 'सिडको'च्या ताब्यात; पालघर, रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश

उर्वरित ८० हजार शेतकरी खातेदार अपात्र असण्याची शक्यता होती. पावसाळी अधिवेशनात ११ हजार पात्र लाभार्थ्यांचा विषय झाला. उर्वरित एक लाख शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार का, असा प्रश्न होता. यासाठी अधिवेशनात आमदार पी. एन. पाटील यांनी विषय मांडला आहे.

यानंतर शासनाने परिपत्रकाद्वारे वर्षात दोनवेळा पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दोन दिवसांत तपासून तयार ठेवाव्यात. यासाठी सलग तीन दिवस सुट्ट्या असताना सचिवांच्या सुट्ट्या रद्द करून काम करावे, असे आदेश दिले. डीडीआर कार्यालयाकडून आदेश येताच पोर्टल सुरू होताच पोर्टलवर याद्या अपलोड कराव्या लागतील. तीन वर्षांत दोनदा पीककर्ज घेतलेले असे चौदा हजार शेतकरी खातेदारांना फक्त लाभ मिळेल.

Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana
Chandoli Sanctuary : मानव-वन्य प्राण्यांत संघर्ष वाढला; जंगल सोडून प्राणी का पडताहेत बाहेर?

३५ टक्के लाभार्थींना फटका

सहकार उपनिबंधक कार्यालयातील माहितीनुसार, तीन वर्षांत एकदा उचल केलेले ३० ते ३५ टक्के लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांच्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. २०१७ ते २०२० पर्यंत तीन वर्षांत फक्त एकदाच पीककर्ज घेऊन वेळेवर परतफेड केली. अशा शेतकऱ्यांची यादी यापूर्वी अपलोड केली आहे. यामध्ये अशा शेतकऱ्यांना वगळले आहे. जिल्ह्यात असे सुमारे ३६ हजार लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.

Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana
Sangli Tourism : दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख

वीस वर्षे पीककर्ज काढले व वेळेवर कर्जाची परतफेड केली. मात्र, तीन वर्षांत एकदा कर्ज घेतले आणि कर्जाची वेळेवर परतफेड केली. मात्र, आम्हाला अपात्र केले असून लाभ मिळालेला नाही. एकदा कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा.

-युवराज पाटील, शेतकरी (रा. उपवडे, करवीर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.